You are here
Home > चंद्रपूर > अंबुजा प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

अंबुजा प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

चंद्रपूर – 24 जून रोजी अंबुजा सिमेंट कंपनी उपरवाही च्या गेट समोर जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात प्रकल्पग्रस्त आदिवासी  व शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन मांडले होते.या ठिय्या आंदोलनाला पोलीस बळाचा वापर करून चिरडण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला.यामुळे भडकलेल्या प्रकल्पग्रस्तांनी पोलिसांचा तीव्र विरोध केल्याने परिस्थितीव
चिघडली होती. यावेळी शेकडो प्रकल्पग्रस्तांना अटक करून आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. अंबुजा प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन दिले.

महिला-पुरुष आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल केल्याने संतापलेल्या प्रकल्पग्रस्तांनी जामीन घेण्यास नकार दिला.यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार यांनी मध्यस्ती करून जनविकास चे पप्पू देशमुख यांच्याशी संपर्क  साधला तसेच या प्रश्नावर तातडीने कारवाई करण्याचे हेतूने ठोस पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.यानुसार आज दिनांक 26 जून रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अंबुजा मुळे भूमिहीन झालेल्या प्रकल्पग्रस्त तसेच  जनविकास  सेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते . जिल्हाधिकारी खेमणार यांनी तातडीने शासनाला  यासंदर्भात  पाठवलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने कारवाई करण्याच्या साठी  पत्र दिले व व्यक्तिगत स्तरावर महसूल विभागामध्ये संपर्क साधला. येत्या काही दिवसात याबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. शासनाने अंबुजा प्रकल्पग्रस्त आदिवासी व शेतकऱ्यांना न्याय न दिल्यास याहीपेक्षा आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देशमुख यांनी दिला.
प्रशासनाने अंबुजा सिमेंट कंपनीच्या प्रकल्पग्रस्तांवर केलेल्या अन्यायकारक कारवाईच्या विरोधात येत्या काही दिवसात जन्विकास सेनेतर्फे जिल्ह्याभरात ठिक-ठिकाणी आक्रमकतेने विरोध करण्यात येणार असल्याची माहिती देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेली आहे.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा