You are here
Home > चंद्रपूर > इको-प्रो संस्थेस ‘राष्ट्रीय युवा पुरस्कार’ जाहीर

इको-प्रो संस्थेस ‘राष्ट्रीय युवा पुरस्कार’ जाहीर

12 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिनी होणार सन्मान

चंद्रपूरः युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार तर्फे दिला राष्ट्रीय युवा पुरस्कार याकरिता चंद्रपूर येथिल पर्यावरण, वन-वन्यजीव व सामाजिक क्षेत्रात कार्य करणाÚया इको-प्रो संस्थेस जाहीर झालेला आहे.

भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयातर्फे दरवर्षी युवा क्षेत्रात कार्य करणाÚया युवक व संस्थाना राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे उदद्ेश राष्ट्रीय विकास व समाजसेवेच्या क्षेत्रात तरूणांना उत्तेजन देणे, समाजाप्रती जबाबदारीची भावना विकसित करणे आणि स्वतः एक चांगले नागरिक होण्यासाठी युवकांमध्ये शक्यता वाढविणे हे आहे. राष्ट्रीय युवा पुरस्कार 1985 पासुन दिले जात आहेत. दरवर्षी सदर मंत्रालयातर्फे राष्ट्रीय युवा महोस्तव दरम्यान राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधत राष्ट्रीय युवा पुरस्कार दिले जात होत. यंदा मात्र या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे निमीत्ताने 12 आॅगष्ट ला दिले जाणार आहेत.

राष्ट्रीय युवा पुरस्कार 2016-17 करिता राज्यातुन इको-प्रो संस्थेची निवड करण्यात आलेली आहे. इको-प्रो संस्था मागील 15 वर्षापासुन युवकांच्या माध्यमाने विवीध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केले आहे. पर्यावरण, वन-वन्यजिव, आपातकालिन व्यवस्थापन, पुरातत्व ऐतिहासिक वारसा संवर्धन, रक्तदान आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रात कार्य सुरू असुन वेळोवेळी संस्थेच्या विवीध क्षेत्रातील कार्याकरिता इको-प्रो संस्थेस गौरविले गेले आहे. यापर्वी संस्थेस ‘जिल्हा युवा पुरस्कार’ व ‘राज्य युवा पुरस्कारांने’ सुध्दा सन्मानित करण्यात आलेले आहे. इको-प्रो संस्थेची राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी निवड होणे हे संस्थेच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आलेली आहे. यामुळे संस्थेची एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे. मागील अनेक वर्षापासुन संस्थेच्या कार्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग घेणारे, सहकार्य करणारे संस्थेचे युवक व नागरीकांचा सुध्दा हा सन्मान आहे. येत्या 12 आॅग ला या एका कार्यक्रमात इको-प्रो संस्थेस पुरस्कारांचे वितरण होणार असल्याचे एका पत्रकाव्दारे नुकतेच संस्थेस कळविण्यात आलेले आहे.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा