You are here
Home > महत्वाची बातमी > मुंबईत मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा, राज ठाकरेंनी केले संबोधित

मुंबईत मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा, राज ठाकरेंनी केले संबोधित

मुंबई – मुंबईतील प्रभादेवी येथे मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा शनिवारी पार पडला. या मेळाव्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित करतांना केंद्र सरकारवर निशाणा साधला. ईव्हीएम, जीएसटी, नोटबंदी, यांसारख्या अनेक विषयांवर टीका केली. दरम्यान ईव्हीएमविरोधात 21 तारखेला मोर्चा काढण्यात येणार होता. पण राज्यातील पूरस्थितीमुळे तो ढकलण्यात आला आहे. मोर्चाची तारीख लवकरच जाहीर होणार असल्याचे राज यांनी सांगितले.आज आपण सर्वसाधारण काय झालंय त्यावर बोलू Tv वर कसं दाखवतात तसं आधी ठळक बातम्या वाचू, तर त्या अश्या,
आरटीआयमध्ये फेरबदल झाले, म्हणजे आता हा अधिकार केंद्राने स्वतःकडे ठेवला आहे. आरटीआयमधील सगळी माणसं केंद्र ठरवणार, केंद्राचा अर्थ काय तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा, कारण सगळं ते ठरवणार. आरटीया अधिकाऱ्याला तिथे राहायचे असेल तर सरकार समोर मिंदे व्हावे, म्हणजे यापुढे माहिती मिळणार नाही. पुढचा कायदा केला दहशतवादी विरोधी कायदा, यात काय तर एका माणसावर संशय आला तरी तो दहशतवादी, पण दहशतवादाची व्याख्या काय, तर नाही. म्हणजे उद्या आंदोलन केल्यास तुम्हालाही दहशतवादी ठरवतील. म्हणजे कोणाला तुरुंगात टाकायचं हे शहा ठरवणार. देशाची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली आहे. जेट एअरवेज बंद झाले पण सरकारने मदत नाही केली. बरेच लोक बेरोजगार झाले. बरेच व्यवसाय बंद व्हायला आले. हिंदुस्थान आरोनॉटिक्स बंद झाले. Bsnl मधील 54 हजार लोक बेरोजगार झाले. ही परिस्थिती अशीच राहिली तर 10 लाख लोक बेरोजगार होतील. टाटांनी टाटा मोटर्स 5 दिवस बंद ठेवली.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा