
वॉर्डातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी राहुल लांजेवार यांचा पुढाकार
इंडस्ट्रीयल इस्टेट प्रभाग क्र ६ इथे पाणी टंचाई व प्रभागातील नगरसेवक प्रदीप डे,सुधीर कारगल,धनराज सावरकर व आत्ताच नव्याने निवळून आलेल्या नगरसेविका कलावती यादव यांच्या उदासीन व बेजवाबदार पणा मूळे या प्रभागाचा विकास रखळलेला आहे , यांच्या कामचोर पणा व निवळणुका आल्या की फक्त मतांच राजकारण करणे, नंतर जनतेला,जनतेच्या समस्या सोडविण्या करीता टाळाटाळ करणे किंवा सत्ताधाऱ्याकडे समस्या घेऊन जाण्याचा सल्ला देऊन स्वतः मोकळे होत असल्याचा अनुभव वॉर्डातील अनेक नागरिकांना येतोय. प्रभागातील पाणी टंचाई बघता आज भारतीय जनता पार्टी च्या वतीने प्रभागाच्या विकासाचा ध्यास बाळगुन असणारे सर्वोप्तरी मदतनिस स्थायी समिती अध्यक्ष राहुलभाऊ पावडे यांच्या माध्यमातून इंडस्ट्रीयल प्रभाग क्र ६ येथली श्रमिक नगर ,व रयतवारी परिसरात नागरिकांच्या मागणी नुसार भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी राहुल लांजेवार यांनी पुढाकार घेत पाण्याच्या समस्येवर तोडगा म्हणून वॉटर टॅंक लावून दिली, या हेमंत सिंगवी, गजानन उरकुडे सिनूजी मेकला, गिरजाप्रसाद राम ,विनोद गुप्ता व नागरिक उपस्थित होते..!!