You are here
Home > गडचिरोली > विदर्भातही पूरस्थिती, गडचिरोलीत दोघे बुडाले

विदर्भातही पूरस्थिती, गडचिरोलीत दोघे बुडाले

नागपूर : संततधार पावसामुळे विदर्भातील अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण होऊन सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात दोन जण पुरात वाहून गेले. अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आल्याने गावांमध्ये पाणी शिरले. संसतधार पावसामुळे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील भामरागड, अहेरी, सिरोंचा तालुक्यात नदी-नाल्यांना पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. दोन दिवसात दोघे पुरात वाहून गेले. भामरागडमध्ये पुराचे पाणी शिरल्याने ३०० कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले.
भंडारा व गोंदिया जिल्ह्यांशिवाय शेजारील सीमावर्ती मध्य प्रदेशातही दमदार पाऊस असल्याने पुजारीटोलासह गोंदिया जिल्ह्यातील धरणाचे दरवाजे उघडणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. परिणामी एकट्या भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीकाठावरील ८२ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा