You are here
Home > आंतरराष्ट्रीय > इराणच्या नौदलाने आणखी एक परदेशी मालवाहू जहाज पकडले

इराणच्या नौदलाने आणखी एक परदेशी मालवाहू जहाज पकडले

तेहरान – इराणच्या नाैदलाने पर्शियन खाडीत आणखी एक तेलवाहू जहाज पकडल्याचा दावा केला आहे. या जहाजावरील सात खलाशांना अटक करण्यात आल्याची माहिती रिव्हाेल्युशनरी गार्ड्सने दिली. एकाच महिन्यात या सागरी क्षेत्रात पकडलेल्या मालवाहू जहाजांची संख्या तीन झाली आहे. फारसी बेटाजवळ इराणी नाैदलाने बुधवारी ही कारवाई केली. जहाजाद्वारे ७ लाख लिटर तेल वाहून नेले जात हाेते, असा इराणचा आराेप आहे. तेलाची तस्करी केली जात हाेती. त्याच वेळी इराणच्या गस्त घालणाऱ्या पथकाला संशयास्पद हालचाली दिसून आल्या हाेत्या. त्यानंतरच्या कारवाईत जहाजाला ताब्यात घेऊन बुशेहरकडे रवाना करण्यात आले. ब्रिगेडियर रामेझान झिराही यांच्या नेतृत्वाखाली ही जप्तीची कारवाई करण्यात आली. हे तेल तस्करीमार्गे नेले जात हाेते. इराणने तेल जहाज जप्त करण्याची ही तिसरी वेळ आहे. १८ जुलै राेजीदेखील कारवाई झाली हाेती. तेव्हा ब्रिटिशांचा ध्वज असलेले स्टेना इम्पेराे नावाचे जहाज हाॅर्म्युझ सागरी क्षेत्रात पकडण्यात आले हाेते. ब्रिटनने आंतरराष्ट्रीय सागरी नियमांचा भंग केला हाेता, असा ठपका ठेवून इराणने ही कारवाई केली हाेती.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा