You are here
Home > महाराष्ट्र > शिवसेना अखेर भाजप सोबतच जाणार; मांडवलीकरिता मुजोरी?

शिवसेना अखेर भाजप सोबतच जाणार; मांडवलीकरिता मुजोरी?

मुंबई :- महाराष्ट्रात शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून हिंदुत्ववादी म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारी भाजप शिवसेना कार्याध्यक्ष आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या लाचारीचा फायदा घेऊन महाराष्ट्रात गमिनी कावा करून सत्तेपर्यन्त पोहचली आणि आम्हीच महाराष्ट्रात मोठे म्हणून शिवसेनेला दुय्यम स्थान दिले. एकेकाळी शिवसेना महाराष्ट्रात १७१ जागी आणि भाजप ११७ जागी विधानसभा लढवायचे पण मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने खेळी करून शिवसेनेला तोंडघशी पाडले आणि स्वतःचे संख्याबळ वाढवले व मुख्यमंत्री पद मिळविले.आता महाराष्ट्रात शिवसेना लहान भाऊ ठरला आणि भाजप सोबत शिवसेना फरकटत गेली.ज्या महाराष्ट्रात शिवसेनेच्या भरोशावर भाजप मोठी झाली त्याच शिवसेनेला अवघ्या १२४ जागा वाट्याला देवून भाजपने स्वतःच्या वाट्याला उर्वरित जागा घेतल्या आणि १०४ ठिकाणी विजय मिळविला. असे जरी असले तरी आता सत्ता स्थापनेसाठी भाजपची कोंडी करून शिवसेना मुख्यमंत्री पदावर दावा करीत आहे. यामुळे भाजप संतापली असून वेळ आली तर राष्ट्रपती शासन लावू पण शिवसेनेला मुख्यमंत्री पद देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. अर्थात शिवसेना शेवटी भाजप समोर लोटांगण घेऊन मांडवली करतील अशीच ऐकून शक्यता आहे.आणि त्यासाठीच शिवसेनेची मुजोरी चालली आहे. आणि आपल्याला महत्त्वाचे खाते मिळवून घेण्यासाठी ही शिवसेनेची रणनीती संजय राऊत यांच्या माध्यमातून सुरू आहे.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा