You are here
Home > चंद्रपूर > नायब तहसीलदार भास्करवार यांनी अधिकाराचा केला दुरुपयोग आणि दिला अजब आदेश.

नायब तहसीलदार भास्करवार यांनी अधिकाराचा केला दुरुपयोग आणि दिला अजब आदेश.

चंद्रपूर प्रतिनिधी :- चंद्रपूर तहसील कार्यालय मागील अनेक वर्षांपासून अनोख्या वादात सापडले आहे. कारण इथे सत्ताधारी यांचीच मर्जी चालत असून तहसीलदार खांडरे ते आता सद्ध्या हयात असलेले नायब तहसीलदार अजय भाष्करवार यांच्या पर्यंत सर्वच जणू सत्ताधारी भाजपचे मांडलिक आहेत की काय ? असाच प्रश्न सध्या सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
प्रश्न होता चंद्रपूर शहरातील एका महानगर पालिकेच्या जागेवर सुरभी महिला बचत गटाचे स्वस्त धान्य दुकान बांधण्याचा. यासाठी बाकायदा महानगर पालिकेने सुरभी महिला बचत गटाला शहरातील बगड खिडकी पीएच नगर येथील मनपाच्या हद्दीत असलेली जागा दिली आणि त्याचे बांधकाम पोलिसांच्या संरक्षणात सुरू होते मात्र काहींना हे बांधकाम होऊ द्यायचे नव्हते त्यामुळे त्यानी आक्षेप घेतला आणि त्यांनी मनपा महापौर यांच्या मदतीने ते बांधकाम ज्याला महानगर पालिकेनेच परवानगी दिली ते थांबवण्यासाठी नायब तहसीलदार अजय भाषकरवार यांच्या कडे तक्रार केल्यानंतर अवघ्या एका तासात भाष्करवार यांनी त्या बांधकामावर स्थगिती आणली. खर तर हेह्या मूर्दाड अधिकाऱ्यांनी हे सुद्धा बघितले नाही की ज्याअर्थी मनपा आयुक्तांनी परवानगी दिली तिथे नायब तहसीलदार यांचा आदेश कसा काय चालेल ? पण भाष्करवार ज्यांच्यावर पैसे घेऊन आदेश करण्याच्या अनेक तक्रारी आहेत त्या भाष्करवार यांनी हा आदेश दिला म्हणजे प्रशासन म्हणून नेमक काय चाललंय ? हेच कळत नाही.यासाठी सुरभी महिला बचत गटांच्या महिला आता आपल्या हक्कासाठी कायदेशीर मार्गाने तर लढणार आहेच पण अजय भाष्करवार सारख्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी लवकरच मोठे पाऊल उचलणार असल्याची माहिती आहे. यामधे मजेची गोष्ट अशी आहे की मनपा आयुक्त महिला बचत गटांना रोजगारासाठी जागा देतात आणि मनपा महापौर त्याच जागेवर बांधकाम होऊ देत नाही म्हणजे चंद्रपूर मनपा मधे नेमक चाललंय तरी काय ? असा प्रश्न पडतो.मात्र अजय भाष्करवार सारख्या सत्तेच्या दावणीला बांधले गेलेल्या अधिकाऱ्यांवर जनतेकडून मार पडणार नाही तोपर्यन्त जनतेला न्याय मिळणार नाही असेच ऐकून चित्र दिसते कारण मनपा प्रशासनाच्या ताब्यात असलेल्या जागेवर नायब तहसीलदार आदेश करतो म्हणजे नायब तहसीलदार क्लासवन अधिकारी आहे का ? असाही प्रश्न या अर्थाने विचारल्या जाणार आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा