You are here
Home > चंद्रपूर > चंद्रपूर मनपामध्ये सावळागोंधळ; श्रेष्ठवादाची लढाई !

चंद्रपूर मनपामध्ये सावळागोंधळ; श्रेष्ठवादाची लढाई !

चंद्रपूर /प्रतिनिधी:-

चंद्रपूर मनपा मधे भाजप ची एकहाती सत्ता आहे. जे काँग्रेसचे नगरसेवक विरोधात आहे ते नेमके सभागृहात काय करतात हेच कळायला मार्ग नाही कारण एकीकडे खुद्द पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मनपा आयुक्तांना दररोज पिण्याचे पानी मिळावे म्हणून आदेश देवून नियमित पानी पुरवठा करा अन्यथा आयुक्तांवर जीवनावश्यक गरजा न पुरविल्यास पोलिस करवाई आणि कायदेशीर करवाई करण्याचे नियोजन भवन येथे मागील वर्षी जाहीर केले मात्र मागील एक वर्षांपासून त्यावर अमलबजावणी झाली नाही तर उलट सत्ताधारी नगरसेवक पानी पुरवठा कंत्राटदाराच्या कार्यालयात जाऊन तिथे कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारतात तर मग हे नगरसेवक सभागृहात झोपा काढतात का ? असा प्रश्न पडतो आणि आयुक्त जर त्यांचे आणि आयुक्तांना पानी पुरवठा कंत्राटदार जर ऐकत नसेल तर सर्वसामान्य जनतेचे काय ? असाही यक्ष प्रश्न आहे. त्यामुळे चंद्रपूर मनपा मधे सर्व श्रेष्ठ कोन ? याबद्दल तर्कवितर्क लावल्या जात आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा