You are here
Home > चंद्रपूर > शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांचे बेहाल,

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांचे बेहाल,

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्हा हा औद्दौगिक जिल्हा म्हणून परिचित असून जिल्ह्यात सामान्य रुग्णालय असतांना ज्या असुविधा होत्या त्या वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर होणार नाही आणि चांगली सुविधा रुग्णांना होईल अशी चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला अपेक्षा होती.मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होऊन तब्बल चार वर्ष लोटून सुद्धा इथे रुग्णांना असूविधेचा सामना करावा लागत आहे. इथे रुग्णांसाठी डॉक्टर अपुरे आहेतच शिवाय औषधीचा तुटवडा आहे. रुग्णांना प्रसंगी खालीच ( जमिनीवर ) झोपावे लागतात त्यात रुग्णांच्या नातेवाईकांना तर बाहेरच रहावे लागत आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयच स्वतः बिमार असल्याने रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाले आहे.अर्थात अर्थमंत्री ज्या जिल्ह्यात आहे आणि तेच जिल्ह्याचे पालकमंत्री आहे त्यांच्याच क्षेत्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जर असुविधा असेल तर येथील जणतेनी न्याय मागायचा कुणाकडे ? हाच गंभीर प्रश्न आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा