
आष्टी प्रतिनिधी :-
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील आष्टी शहरात काल दि.5 रोजी रात्रौ 10:30च्या सुमारास जमिनीच्या वादातून एकाची धारदार शस्त्रांनि सपासाप वार करून भर रस्त्यावर हत्त्या झाल्याची घटना घडली
मृतक व्यक्तीचे नाव बळवंत चंद्रशेखर गौरकर वय 50 वर्ष असे असून मृतकाचे व संशयित आरोप म्हणून पोलिसांनी ज्यांना ताब्यात घेतले आहे त्यांचे गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीचे वाद न्यायालयात सुरू असताना गेल्यावर्षी न्यायालयाचा निर्णय हा मृतकाचे बाजूने लागला असल्याने त्यांनी त्या अतिक्रमित जागेवरील वास्तव्यास असलेली घरे बुलडोजरच्या साह्याने पाडण्यात आले होते.मात्र मद्यनतरी च्या काळात काही कारणाने त्या प्रकरणाला स्थगिती देण्यात आल्याचे कळते मात्र गेल्या आठवड्यात पुन्हा न्यायालयाच्या निकालाअंती त्या वादग्रस्त जमिनीवर टॅक्टर लावून नांगरणी,पेरणी गौरकर यांनी सुरू केली होती. त्यातच मारेकार्यानी सापळा रचून दनांक 5 रोजी रात्री 10:30च्या सुमारास बळवंत गौरकर यांची धारदार शस्त्राने हत्त्या करून मारेकरी पसार झाले.मृतकाचे भाऊ शालीक गौरकर यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी म्हणून प्रमोद लखमापुरे,प्रदीप लखमापुरे ,कपिल पाल,संजय पोटवार, राकेश बेलसरे,सुधीर पाल,मोरेश्वर पाल,यांना आष्टी पोलिसांची ताब्यात घेतले असून कलम 302,349,147 सहकलमानवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पीआय निर्मल हे स्वता करीत आहे.