You are here
Home > महत्वाची बातमी > राज्य सरकारने पूरग्रस्तांसाठी केंद्र सरकारकडे केली 6 हजार 800 कोटींच्या निधीची मागणी

राज्य सरकारने पूरग्रस्तांसाठी केंद्र सरकारकडे केली 6 हजार 800 कोटींच्या निधीची मागणी

मुंबई – राज्य सरकारने पूरग्रस्त भागांसाठी केंद्राकडे 6 हजार कोटींची मदत देण्याची मागणी केली आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या पूरग्रस्त भागासाठी 4700 कोटी तर कोकण, नाशिक आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी 2100 कोटींची मदत मागितली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कोल्हापूर-सांगली आठ दिवसांपेक्षा जास्त पूराने थैमान घातले होते. आता हळूहळू दोन्ही शहरातील तसेच आसपासच्या परिसरातील पूर ओसरून परिस्थिती सुधारत आहे. या महापूरात ज्यांची घरे पडली, वाहून गेली सरकार त्यंना घर बांधून देणार आहे. तसेच सांगली-कोल्हापूर पूरग्रस्त भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 576 कोटींची तरतूद करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिला.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा