You are here
Home > चंद्रपूर > लिंगणडोह कुसंबीचा तो गेट खुलाकरा .अन्यथा तिव्र आंदोलन

लिंगणडोह कुसंबीचा तो गेट खुलाकरा .अन्यथा तिव्र आंदोलन

[गडचांदूर प्रतिनिधी :-

सार्वजनिक भूमापन नकाशामध्ये नोंद असलेल्या रस्त्यावर मानीकगड सिमेंट कंपनीने नियमबाहय कब्जा करूण गेट बसवून नागरीकाना ये-जा करण्यास प्रतिबंध घातल्याने गत ६ महिन्यापासून जनसत्याग्रह संघटनेच्या नेतुत्वात आंदोलन झाले होते.त्या आंदोलनाला दडपण्यासाठी प्रशासनाने ५० , ते ६० आदीवासीवर पिण्याचे पाण्यासाठी व .रसत्यासाठी आंदोलन केले म्हणून गुन्हे दाखल केले होते.मात्र शेतकऱ्याची जमीन  व पाण्याचा हक्क हिरावला त्यामुळे रस्ता बंद पाडला याबाबत शेकडो तक्रारी असताना साधी चौकशी केली नाही.मात्र आंदोलंन करणाऱ्या नागरिकांवर  गुन्हे दाखल केले. जमीनीचोरी गेल्याच्या ६ तक्रारी करून सुद्धा पोलीसानी साधी चौकशी न करता महसुल विभागाकडे पत्रव्यवहार केला मात्र त्याचे कडून उतर आले नाही म्हणुन टोलवा टोलवी सुरू आहे भुृष्ठ अधिकार व आदीवासी जमीन खरेदी व फेरफार नोंदी रद्द करण्याची कार्यवाही झाली नाही.प्रशासनाने मागलेला कालावधी लोटला मात्र कार्यवाहीचे घोडे सरकले नसल्याने कुसूंबी येथिल शेतकरी आबीद अली याच्या नेतुत्वात उपविभागीय अधिकारी योगेश कुभेंजकर तहसिलदार होळी याची भेट घेऊन समस्या सबंधी व प्रलंबित तक्रारीवर तोडगा काढून निर्णय घ्या व कंपनीचा गेट खुला करा यासाठी निवेदन देऊन चर्चा केली व आंदोलन तिव्र करण्याचा इशारा दिला यावेळी अरूण मडावी बापूराव आत्राम शामराव मगांम पत्रु कुडमेये अयु आत्राम झाडु सिडाम लक्ष्मी मेश्राम भाऊराव किन्नाके माछु सिडाम इसरू मेडमे यांचेसह . सर्व प्रकल्पबाधीत आदीवासी शेतकरी उपस्थीत होते १५ दिवसात तो गेट खुला करा अशी मागणी रेटून धरली

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा