You are here
Home > राजकारण > महाराष्ट्रातील सत्तेच्या आखाड्यात पवारांचा पावर !

महाराष्ट्रातील सत्तेच्या आखाड्यात पवारांचा पावर !

  • लक्षवेधी :-

भारतातील राजकीय परिस्थिती पाहता भाजपा विशेषतः मोदी आणि अमित शहा ने देशातील मोठे नेते सोनिया गांधी, राहुल गांधी, लालुप्रसाद यादव, ममता बॅनर्जी, चंद्रबाबू नायडु, ओमर अब्दुल्ला, नितीशकुमार, मुलायम सिंग यादव, मायावती यांचे देशातील राजकीय अस्तित्व अक्षरशः संपवले आहे . तर याच भाजपाने महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातुन अशोकराव चौहान, माणिकराव ठाकरे, सुशील कुमार शिंदे,एकनाथ राव खडसे या बड्या नेत्यांसह RPI, VBA, रासप, व मित्र पक्ष संपवले, आणि शिवसेनेला अक्षरशः मेटाकुटीस आणले, मात्र पवार साहेबांच्या राजकारणाला केवळ हात  घालण्याचा प्रयत्न केला तर त्याचे गंभीर परिणाम पहिल्यांदाच भाजपाला बघायला मिळाले. पवार साहेबांनी सर्वाना जणू जेरीस आणले. शिवसेनेच तस अस्तित्व टिकवून ठेवलं आणि काँग्रेस ला संजीवनी दिली तर  राष्ट्रवादी ची ताकद मोदी शाहाला दाखवुन दिली. महाराष्ट्रात निवडणुका होऊन आजचा 14 वा दिवस उगवला मात्र अजुनही भाजपा ला निकालाच्या दिवशी बनवलेले बुंदीचे लाडु वाटायचा मुहूर्त काही सापडलेला  नाही. इकडे मोहन भागवत, नितीन गडकरी चिंतेत आहेत. मोदी बोलायला तयार नाहीत, अमित शहा ला काही सुचत नाही, सुधीर मुनगंटीवाराच्या चेहऱ्यावर नैसर्गिक हास्य नाही. राज्यपालांना पहिल्यांदा इतकी लोकं भेटायला गेली असावीत, पत्रकारांची उत्कंठा क्षणाक्षणाला कलाटणी घेते आहे, संजय राऊत पवार साहेबांना भेटुन नव्या जोमात आहे तर फडणवीस पुर्ण कोमात गेलेले आहे. त्यामुळे ते मीडिया समोर यायला तयार नाहीत. आज या सर्व सूडाच्या राजकारणाला एकटेच पवार साहेब उरून पुरलेत. महाराष्ट्राच्या मातीतील ८० पार केलेला हा अखेरचा योद्धा आहेत. परत महाराष्ट्र्त असा नेता होणे नाही. संघर्ष करत राहिलात तर कितीही मोठा शत्रु जेरीस आणता येतो हे साहेबांनी सिद्ध केलें. अवघ्या देशाला महाराष्ट्राच्या कणखर बाण्याचे स्वाभिमानी दर्शन घडवणाऱ्या व प्रत्येक तरुणाला जगण्याची, लढण्याची जिद्द व नवी ऊर्जा देणाऱ्या या युगनायकास जनता कायम लक्षात ठेवेल नव्हे येणाऱ्या पिढ्या आठवण ठेवेल.मोदी आणि अमित शहा सहित फडणवीसांपर्यंत स्वतः ला वाघ समजणाऱ्या सत्ताधीशांची त्यांच्याच जंगलात जाऊन जाळीत पकडणारे शरद पवार हे खरोखरंच देशाच्या राजकीय क्षितिजावर चमकणारे तारे ठरले आहे !!!…

One thought on “महाराष्ट्रातील सत्तेच्या आखाड्यात पवारांचा पावर !

  1. राजू…खूपच छान लिहिला अग्रलेख..खरंच पवारांची ‘पाॅवर ‘ या निवडणुकीत सर्वांनाच कळली. ‘तेल लावलेल्या पैलवाना’ला यांनी पकडण्याचा प्रयत्न केला पण ते हातात तर आलेच नाही, पण पकडणारेच तोंडावर आपटले.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा