You are here
Home > चंद्रपूर > शिवसेना काँग्रेस आमदारांना ४०, ५० कोटीची आँफर तर अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांना किती ?

शिवसेना काँग्रेस आमदारांना ४०, ५० कोटीची आँफर तर अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांना किती ?

  1.  चंद्रपूर शहरात चर्चेला उधाण !

चंद्रपूर प्रतिनिधी :-

विधानसभा क्षेत्रात प्रथमच किशोर जोरगेवार या अपक्ष आमदाराला जनतेने 70 हजार पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून देवून इतिहास रचला आहे. जे मताधिक्य दस्तुरखुद्द पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा आजपर्यंत घेतले नाही, त्यापेक्षा दीडपट मताधिक्य घेवून चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या मनावर आणि मतावर किशोर जोरगेवार यांनी राज्य केलं आहे. यामागे कारणही तेवढंच महत्वाच आहे, ज्या नाना शामकुळेंना चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील जनतेने सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रेमाखातर आणि त्यांच्या कामाखातर दहा वर्ष निवडून दिले त्यांच्याबद्दल जनतेत रोष होता आणि आता स्थानिक उमेदवारच हवा या एका तत्वाने किशोर जोरगेवार यांना जनतेने भरभरून मतदान केले .अर्थात हा सत्ताधारी भाजप विरोधातील जनतेचा कौल होता हे जाहीर आहे. त्यामुळेच किशोर जोरगेवार यांनी निवडून आल्यानंतर भाजपला समर्थन देवू नये अशी सगळ्या मतदारांची इच्छा होती.कारण किशोर जोरगेवार यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे,  शिवसेना आणि इतर सामजिक राजकीय संघटनांनी मोठे कष्ट ऊपसले होते. पण अगोदरच किशोर जोरगेवार यांचा कल हा भाजपकडे होता आणि केवळ नाना शामकुळें यांना हरवणे आणि त्यांना नागपूरला पाठवणे हा एक डाव ठरला होता. त्यामुळेच जोरगेवार यांनी भाजप ला बिनशर्त समर्थन दिलं हे जाहीर होतं. मात्र आता किशोर जोरगेवार यांनी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर व भाजपला बिनशर्त समर्थन दिल्यानंतर सुद्धा काँग्रेस खासदार बाळू धानोरकर आणि काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची सदिच्छा भेट घेवून आपण काँग्रेस सोबत सुद्धा असल्याचे किशोर जोरगेवार यांनी दाखवून एक प्रकारे सत्ता स्थापनेच्या घोडा बाजारात आपली किंमत वाढवली असेल का ? हा प्रश्न आता चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील जनता करू लागली आहे. कारण जर सत्ताधारी भाजपला निवडूनच द्यायच होतं तर नाना शामकुळें यांनाच जनतेने निवडून दिलं असत, आणि मग जर किशोर जोरगेवार हे भाजपलाच समर्थन देणार असतील तर नाना शामकुळें कुठे वाईट होते ? व आता जर भाजपची सत्ता असती तर ते मंत्री सुद्धा झाले असते ? अशी चर्चा सुद्धा राजकीय पटलावर चर्चील्या जात आहे. आता प्रसारमाध्यमांद्वारे भाजप सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेच्या व काँग्रेसच्या एकएका आमदाराला ४० ते ५० कोटीची आँफर सद्ध्या देत असल्याची माहिती आहे त्यामुळे किशोर जोरगेवार यांना सुद्धा तितकीच आँफर असेल का ? याबद्दल चंद्रपूर शहरात चर्चेला मोठे उधाण आले आहे. कारण किशोर जोरगेवार हे जरी मी विकास करण्यासाठी भाजपला समर्थन दिले असे म्हणत असले तरी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील जनतेने भाजप विरोधात कौल दिला आहे, कारण भाजपची सत्ता येथील जनतेला भावलेली नाही त्यामुळेच किशोर जोरगेवार यांनी भाजपला बिनशर्त समर्थन देवून एकप्रकारे चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील जनतेशी गद्दारी आणि धोखाधडी केल्याच्या प्रतिक्रिया  मतदाराकडून उमटत आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा