You are here
Home > Breaking News > बल्लारपूर पोलिसांनी पकडला कारमधील दारूसाठा,

बल्लारपूर पोलिसांनी पकडला कारमधील दारूसाठा,

बल्लारपूर प्रतिनिधी :-
बल्लारपूर पोलिस स्टेशन अंतर्गत अवैध धंदे मोठ्या प्रमाणांत सुरू असल्याची ओरड होतं असतांनाच पोलिस प्रशासन सुद्धा तेवढ्याच ताकतीने उघडकीस आणत असल्याचे चित्र आहे.नुकतंच बल्लारपूर पोलिस डी बी पथकांनी पो.ना/संतोष दंडेवार पो.शि./2887 अजय हेडाऊ यांच्या नेत्रुत्वात एका कारमधून दारू वाहतूक करणाऱ्या ईसमाला रंगेहाथ अटक केली आहे. एक इसम आपल्या कार मधून दारु आणुन त्याची विक्री करत असल्याची माहिती डीबी पथकाला मिळाली होती.त्यावेळी स्थानिक गुन्हे पथक अधिकरी व कर्मचारी यांनी सदर ठिकाणी रेड केली असता तेथे एक इसम आढळला व त्याचेकडे असलेल्या कारच्या पाठी मागच्या सीटच्या आत ऑफीसर चॉईस कंपनीच्या 90 एमएल च्या एकुण 480 नग अंदाजे 72,000 रुपयाचा माल व कार क्र. MH02-BP-3983 अंदाजे 3,50,000 रुपयाची व विवो कंपनीचा 10,000 रुपयांच मोबाइल फोन असा एकुण 4,32,000 रुपयाचा माल जब्त करण्यात आला आहे. त्या वरून बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे सदर इसमा विरुध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे .

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा