You are here
Home > चंद्रपूर > ट्रक अपघातात जखमी वेदांतचा अखेर नागपूर येथे म्रुत्यु !

ट्रक अपघातात जखमी वेदांतचा अखेर नागपूर येथे म्रुत्यु !

पोलिसांच्या स्थितील करवाई विरोधात परिवारातील सदस्यांचे रामनगर पोलिस स्टेशन येथे ठिय्या आंदोलन!

चंद्रपूर प्रतिनिधी :-

ऐन दिवाळीच्या दिवशी  25 तारखेला वडील आणि मुलगा दुचाकी वाहनावरून जात असताना जनता कॉलेज चौकातून टर्निंग पॉइंटला चालत्या गाडीवरून घसरून वेदांत नाईक हा नऊ वर्षीय बालक पडला व ट्रकच्या चक्क्यात तो सापडला त्यामधे तो गंभीर जखमी झाला होता, त्यामुळे त्याला नागपूर येथे हलवण्यात आले होते मात्र उपचारा दरम्यान त्याचा तब्बल १३ दिवसानंतर मृत्यू झाला. आपला मुलगा ट्रक चालकांच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याने त्या ट्रक चालकांवर कडक करवाई करावी व आम्हच्या मुलाला न्याय द्यावा या मागणीसाठी परिवारातील सदस्यांनी मुलाचा म्रुतदेह रामनगर पोलिस स्टेशन येथे आणून पोलिस स्टेशन येथे ठिय्या आंदोलन केले. उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या नेत्रुत्वात या प्रकरणी म्रुतकाच्या परिवाराची समजूत घालून व योग्य ती करवाई करण्याचे आश्वासन देवून हे प्रकरण मार्गी लावण्यात आले. पोलिस निरीक्षक प्रकाश हाके यांनी भडकलेल्या जनसमुदायाला शिताफीने शांत केल्याने अखेर म्रूतक बालकाचे प्रेत त्याचा घरी नेण्यात आले.मृत्यू

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा