You are here
Home > मुंबई > मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अखेर राजीनामा,

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अखेर राजीनामा,

राष्ट्रपती शासन की येईल सेनेचे सरकार ?

मुंबईनामा :-

महाराष्ट्राच्या राजकारणात आम्हचाच मुख्यमंत्री होईल या शिवसेनेच्या हट्टापाई भाजपचे सत्ता स्थापनेचे स्वप्न पूर्णतः भंग झाले आणि म्हणूनच आम्ही नाही तर कुणीच नाही या भाजप नेत्यांच्या कुटील डावामुळे शेवटी राष्ट्रपती शासन लागणार अशी चर्चा सुरू झाली आहे. यामधे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे काय निर्णय घेतात याकडे महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले आहे. जर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला तर शरद पवार हे काँग्रेसला सुद्धा सोबत आणेल आणि पहिल्यांदाच महाराष्ट्रात एक अनोखे राजकीय समीकरण निर्माण होईल

मी पुनः येईल, मी पुनः येईल असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी ज्याप्रकारे मुख्यमंत्री पदाचे पुन्हा स्वप्न बघितले ते आता इतिहास जमा झाले आहे. आणि शिवसेना आता राष्ट्रवादीला घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करेल की भाजपच्या गमिनिकाव्यातून राष्ट्रपती शासन लावणार ? हा प्रश्न येत्या दोन दिवसात उलगडेल…..

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा