You are here
Home > Breaking News > भाजप करणार शिवसेनेचा अंतर्गत गेम.शेवटी सत्ता युतीचीच?

भाजप करणार शिवसेनेचा अंतर्गत गेम.शेवटी सत्ता युतीचीच?

महाराष्ट्र कट्टा :-

राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच होणार,” असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले असले तरी भाजप   शिवसेनेतील सत्तासंघर्ष एवढा टोकाला पोहोचला आहे की शिवसेना मुख्यमंत्रीपदावर ठाम असे आहे. तर दुसरीकडे भाजपने अल्पमताचं सरकार नको असे राज्यपालांच्या भेटीदरम्यान सांगितले आहे. त्यामुळे “भाजपकडून शिवसेनेची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे संकेत आहे. वरकरणी भाजप सेना प्रसारमाध्यमांच्या माध्यमांतून ज्या प्रकारे भांडताना दिसत आहे ते भांडण तात्पुरते आहे, प्रत्यक्षात  पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी हस्तक्षेप केला तर अगदी काही क्षणात युतीचे झगडे संपेल.अशीच ऐकून स्थिती आहे.

खरं तर शिवसेनेशी बोलणी सुरु आहे. असे नितीन गडकरी यांनी जाहीर केले व गडकरी यांच्या या वक्तव्यावरुन भाजप सेनेची समजूत काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र असं असलं तरीही भाजप कुठल्याही परिस्थितीत मुख्यमंत्री पदावरचा आपला दावा सोडायला तयार नसल्याचेही दिसून येत आहे. आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदासाठी आमचे नेते आहे  असे नितीन गडकरी म्हणाले आहे. त्यामुळे शिवसेनेला सुकाणू समितीचे अध्यक्ष पद आणि काही महत्वाची खाती देवून भाजपचा सत्ता स्थापनेचा दावा यशस्वी ठरू शकतो, याबाबत शंका दिसत नाही.

सत्तास्थापनेचा तिढा अद्याप कायम! 

राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून 15 दिवस उलटले. मात्र, सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही कायम आहे. बहुमत मिळवूनही भाजप-शिवसेना युतीने सत्ता स्थापन केलेली नाही. दोन्ही पक्षांमध्ये 50-50 च्या फॉर्म्युल्यावरुन खडाजंगी पाहायला मिळत आहे. 9 नोव्हेंबरपर्यंत सत्ता स्थापन करणं आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.मात्र आज ती तारीख असतांना देखील महाराष्ट्रच्या राजकारणात राज्यपाल यांना भेटून कुणी सत्ता स्थापनेसाठी दावा करताना दिसत नाही.

इकडे शरद पवारांनी आपण विरोधात बसणार असल्याचं म्हटलं असलं, तरी त्यांच्या दिल्ली भेटीने अनेक पर्यायांची चाचपणी सुरु असल्याचं दिसतं. व राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दर्शवण्यासाठी अनुकूलता दर्शवली आहे. मात्र सेनेला थेट पाठिंबा देणं काँग्रेससाठी अडचणीचं आहे. शिवसेनेला थेट पाठिंबा दर्शवला तर अन्य राज्यात त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे   भाजप आपला डाव वेगळा खेळून सरते शेवटी शिवसेनेला अंतर्गत धोखा दाखवून युतीचे सरकार बसवेल.कारण राज्याचे महाअधिवक्त्यांची फेरनिवड आणि त्यांची राज्यपालांकडे भेट यामुळे राज्यात भाजप राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे संकेत देत आहे आणि त्यामधून शिवसेनेला सुद्धा एकप्रकारे इशाराच आहे. एकतर भाजप कडे या नाहीतर राष्ट्रपती शासन लागू करू असा डाव खेळल्या जात असल्याने भाजप सेनेची सरते शेवटी युती होईलच अशी दाट शक्यता आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा