You are here
Home > मुंबई > भाजप सत्तेत की विरोधात बसणार ? हे ठरणार उद्याच्या कोर कमेटीत!

भाजप सत्तेत की विरोधात बसणार ? हे ठरणार उद्याच्या कोर कमेटीत!

मुंबई कट्टा :-

महाराष्ट्रातील राजकीय सत्ता स्थापनेचा तिढा काही केल्या सुटताना दिसत नाही. एकीकडे भाजप म्हणताहेत की सत्ता महायुतीचीच येईल तर दुसरीकडे शिवसेना मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल अशी आग्रही भूमिका घेत आहेत.जर आता शिवसेनेसमौत आपण झूकलो तर आम्हचाच गेम होईल अशी भिती भाजपला आहे तर भाजपला आपण मुख्यमंत्री पद दिलं तर मागील सन २०१४ च्या विधानसभा सत्तेत असून देखील भाजपने दुय्यम दर्जाचे मंत्री पदे आणि सरकार मधे बरोबरीचा वाटा दिला नसल्याने याही वेळी भाजपवाले आपला गेम करेल म्हणून शिवसेना सुद्धा आपला मुख्यमंत्री पदांवरचा हक्क सोडायला तयार नाही. अशा स्थितीत भाजप शिवसेनेची सत्ता महाराष्ट्रात बनेल का ? याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहे.अशातच महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यास कुणी तरी पुढे याव म्हणून राज्यपालांनी सर्वात मोठी पार्टी म्हणून भाजप ला सत्ता स्थापन करण्याचं निमंत्रण दिलं आहे.मात्र बहुमताच्या आकड्यांपासून २२ आमदारांच संख्याबळ कमी पडत असल्याने भाजप नेत्यांनी उद्या कोरकमेटिची एक बैठक बोलवून सत्ता स्थापनेचा निर्णय घेण्याचे सूतोवातच केले आहे. पण इथे काय निर्णय होईल ?  याकडे सर्व राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून आहे.आता भाजपचा सत्ता स्थापन करण्याचा निर्णय होईल की गैर भाजप सरकार बनेल ?  हे पाहणं महत्वाच आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा