You are here
Home > वरोरा > कोळसा खान होऊनही एकोणा गाव विकासापासून दूर.

कोळसा खान होऊनही एकोणा गाव विकासापासून दूर.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा तालुक्यातील एकोना हे गाव जिल्ह्याच्या औद्दौगिक क्षेत्रात नव्याने जोडले गेले आहे.एकोना हे गाव कोळसा खदान लगत असलेले दोन हजार लोकसंख्येचे आहे.पण हे गाव विकासापासून कोसो दूर आहे. आणि एकोना या गावातील अनेक समस्या अा वासून उभ्या आहेत, येथील विकासकामे ठप्प झाली असून,पुनर्वसनाचा प्रश्न,बेरोजगारीचा प्रश्न, कोळसा वाहतुकीमुळे जडवाहनानी झालेले खराब रस्ते.अश्या अनेक समस्यांच्या विळख्यात एकोणा ग्रामवासी असल्याचे भयावह चित्र दिसत आहे.याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारी व निवेदने देऊनही अधिकारी या समस्याग्रस्त गावाकडे लक्ष देत नसून,प्रशासकीय कार्यालयाचे उंभरठे चढून चढून ग्रामस्थांचे पाय झिजल्याची बोलकी प्रतिक्रिया इथे ऐकावियास मिळत आहे.तालुका प्रशासन एकोणा गावातील समस्याकडे डोळेझाक करीत असले तरी जिल्हा प्रशासनाने समस्याग्रस्त गावाकडे लक्ष द्यावे.अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा