You are here
Home > महाराष्ट्र > शिवसेना -भाजप सरकार बनू न शकल्यास राष्ट्रपती शासन ?

शिवसेना -भाजप सरकार बनू न शकल्यास राष्ट्रपती शासन ?

मुंबई :- महाराष्ट्रात सद्ध्या जणू राजकीय ग्रुहयुद्ध सुरू असल्यागत राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे.भाजप सेनेला महाराष्ट्रात बहुमत मिळालं असलं तरी मागील २०१४ मधे शिवसेनेला फडणवीस सरकारने दुय्यम स्थान देवून एक प्रकारे शिवसेनेला लाचार केलं होतं आणि शिवसेना जणू सत्तेत असून विरोधी पक्षाच्या भूमिकेत दिसत होती. कदचित त्याच अपमानाचा बदला घेवून भाजप नेत्यांचे नामोहरम करण्याची ही संधी शिवसेनेने साधली आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्या नेत्रुत्वात सरकार बसेल अशी अपेक्षा असतांना शिवसेनेच्या नेत्यांनी आणि विशेष म्हनजे संजय राऊत यांच्या पुढाकाराने शिवसेनेने आपलाच मुख्यमंत्री होईल अशी ताठर भूमिका घेऊन फडणवीस यांच्या “मी पुनः येईल,मी पुन्हा येईल” या नाटकाचा अंत केला. मात्र भाजपच्या केंद्रीय नेत्रुत्वाला या राजकीय परिस्थितीमुळे मोठा झटका लागला आहे आणि त्यामुळेच भाजप आता आपली राजकीय सत्ता टिकवण्यासाठी पर्यायाने महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेत्रुत्वात सत्ता स्थापन होऊ नये म्हणून राष्ट्रपती शासन लागू करू शकते अशीच ऐकून भाजपची रणनिती दिसत आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा