You are here
Home > Breaking News > सावली पोलिस स्टेशन अंतर्गत एलसीबी ची मोठी करवाई. लाखोंचा दारूसाठा जब्त!

सावली पोलिस स्टेशन अंतर्गत एलसीबी ची मोठी करवाई. लाखोंचा दारूसाठा जब्त!

चंद्रपूर प्रतिनिधी :

जिल्ह्यात दारूबंदी असली तरी मोठ्या प्रमाणांत अवैध दारू विकल्या जात आहे. पोलिसांचा अपुरा स्टाफ आणि अवैध दारू तस्कराची वाढती संख्या यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं असले तरी पोलिस आपले कर्तव्य इमानदारीने बजावत आहे. नुकतेच सावली पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मुख्य मार्गाने पेट्रोलिंग करतांना पोलिसांना गुप्तचर माहितीच्या आधारे एका हायवा ट्रक ने देशी विदेशी येत असल्याची सूचना मिळाली त्या आधारे पोलीसानी पाठलाग करीत अंदाजे ७१ लाख ९ हजार रु किंमतीची दारू आणि मुद्देमाल पकडल.यामधे ५०० बॉक्स देशी तर २० बॉक्स विदेशी दारू अशी ऐकून ५२० बॉक्स दारू एलसीबी पथकाने पकडली. ही कार्यवाही पीएसआई मुंडे यांच्या नेत्रुत्वात पोलिस निरीक्षक कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.यामधे तीन आरोपीला ताब्यात घेऊन न्यायालयात सादर करण्यात केले जाणार आहे.या करवाई मधे पोलिस कर्मचारी संजय अक्कूलवार महेंद्र बुजाडे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा