You are here
Home > Breaking News > धनाजी जगदाळे यांनी माणुसकी दाखवून परत केले ४० हजार !

धनाजी जगदाळे यांनी माणुसकी दाखवून परत केले ४० हजार !

माणुसकीचा विजय :

खरं तर आता माणुसकी शिल्लक राहिली नाही ही ओरड सर्वत्र बघावयास मिळते पण स्वार्थाने बरबटलेल्या या समाजात काही माणुसकी सुद्धा शिल्लक आहे याचे उदाहरण नुकतेच सातारा येथे बघावयास मिळाले आहे. धनाजी जगदाळे हे ग्रुहस्थ जे अत्यंत गरीब आहे ते सातारा बस स्टँड येथे आपल्या खेडेगावाला परत जाण्यासाठी निघाले होते. त्यांच्या गावाला जाण्यासाठी १० रुपये तिकीट करिता हवे होते पण त्यांच्या जवळ केवळ 3 रुपयेच होते. मात्र त्यांच भाग्य खूब बलत्तर होतं कारण त्यांना बस स्टँडवर तब्बल ४० हजार रुपयाची थैली सापडली होती. कदचित दुसरे व्यक्ती असते तर ते पैसे स्वता जवळ ठेवले असते. पण माणुसकीचे दर्शन घडवून धनाजी जगदाळे यांनी पैशाची चणचण असतांना तब्बल ४० हजार हे मूळ मालकाला परत करण्यासाठी पोलिस प्रशासनाला ती रक्कम सोपवली आणि त्यांना बक्षीस म्हणून मिळालेली एक हजार रुपये सुद्धा न घेता केवळ बस तिकीट करिता फक्त ७ रुपये स्वीकारले. ही बाब खरं समाजात माणुसकी अजूनही शिल्लक असल्याची गौरवपूर्ण बाब आहे आणि इथे माणुसकीचा विजय झाला आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा