You are here
Home > राजकारण > महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याचे संकेत!

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याचे संकेत!

लक्षवेधी :-

महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच निवडणुका झाल्या झाल्या राष्ट्रपती राजवट लागू होण्याचे संकेत मिळत आहे. सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजप यांच्याकडे बहुमत नसल्याने त्यांनी आपण सत्ता स्थापन करणार नाही असे राज्यपाल यांच्याकडे कळवलं आहे. त्यामुळे त्यानंतर दुसरा मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला राज्यपालांनी अवघ्या २४ तासात सरकार स्थापन करण्याचं निमंत्रण दिलं होतं. मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातर्फे शिवसेनेला सत्ता स्थापन करण्याचं संमती आणि समर्थनाच पत्र दिलं नसल्याने राज्यपालांकडे गेलेले शिवसेनेचे नेते राजभवनातून परत आले. त्यानंतर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेची भूमिका मांडून राज्यपालांनी आम्हाला सरकार स्थापनेसाठी वेळ  वाढवून दिला नसल्याची खंत सुद्धा व्यक्त केली. मात्र त्यांना दिलेली २४ तासाची मुद्दत संपल्यानंतर दुसऱ्या मोठ्या पक्षाला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी पाचारण केलं आहे आणि त्यांनाही अवघ्या २४ तासात बहुमताचा आकडा देवून सरकार स्थापन करण्याचं पत्राद्वारे सांगण्यात आलं आहे.परंतु राष्ट्रवादी आणि काँग्रेस जर एकत्रितपणे आले तरी बहुमत शीद्ध करू शकणार नसल्याने त्यांचा दावा सुद्धा चालणार नाही. त्यामुळे आता महाराष्ट्रात राज्यपाल राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे करू शकतात.

महाराष्ट्रात या अगोदर दोन वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यामधे सन १९८० मधे शरद पवार मुख्यमंत्री असतांना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लावली होती तर सन २०१४ मधे पुर्थ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतांना काही काळासाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आल्याचे बोलल्या जात आहे. आणि भारतात सर्वात जास्त ५० वेळा राष्ट्रपती राजवट स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लावली तर त्यापाठोपाठ पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी १२ वेळा राष्ट्रपती राजवट लागू केली होती. आता पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्याच पुढाकाराने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याचे संकेत आहे. कारण शरद पवार हे धूर्त राजकारणी आहेत ज्यांनी या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाजप नेत्यांनी पळवले तरी त्यापेक्षा जास्त आमदार त्यांनी निवडून आणले आणि भाजप सेनेत सत्ता स्थापनेची स्पर्धा लावून दोनही पक्षाचा गेम त्यांनी केल्याने आता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठीच स्वतः शरद पवार कारणीभूत आहे असे दिसते. आता उद्या सायंकाळपर्यन्त काय घडतंय हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

 

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा