You are here
Home > वरोरा > मनसैनिक सुधीर खापने यांनी वाटले कबड्डी संघास मनसेचे पोशाख !

मनसैनिक सुधीर खापने यांनी वाटले कबड्डी संघास मनसेचे पोशाख !

वरोरा प्रतिनिधी :-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कट्टर मनसैनिक सुधीर खापने हे वरोरा तालुक्यातील चिकणी या गावचे मूळ रहिवाशी, पण अगदी युवा अवस्थेत त्यांनी परस्पर घर सोडून मुंबई गाठली आणि मागील१८ वर्षांपासून ते मुंबईला राहतात, तिथे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या ओजस्वी नेत्रुत्वात अनेक सामजिक, राजकीय निवडणूक कार्यात सहभागी होतं असतात, पण माझा ज्या गावात जन्म झाला त्या गावात मनसे हा पक्ष मोठा झाला पाहिजे म्हणून ते नेहमी गावाला आल्यानंतर आपल्या मित्र मंडळींना पक्षात काम करण्याचे सांगतात.नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मनसे उमेदवार रमेश राजूरकर यांना चिकणी या गावातून भरघोस मताधिक्य त्यांनी मिळवून दिले होते, एवढेच नव्हे तर त्यांनी आजूबाजूच्या खरवड, डोंगरगाव इथे सुद्धा मनसे उमेदवाराचा प्रचार स्वखर्चाने करून तिथे सुद्धा मनसेला निर्णायक मतदान मिळवून दिले होते. अर्थात मनसे या पक्षाला आपले संपूर्ण योगदान देणाऱ्या मनसैनिक सुधीर खापने यांनी नुकतेच माऊली क्रीडा मंडळ चिकणी या कबड्डी संघा करीता प्रोत्साहन देण्यासाठी खेळाडुना पोशाख वाटप करून पक्षाचा आदर्श राखला आहे.त्यांच्या या कार्याबद्दल चिकणी या गावातील नागरिकांनी त्यांचे कौतुक करून आभार मानले आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा