You are here
Home > महत्वाची बातमी > रुचा दातारकर या विद्यार्थिनींचा दुर्दैवी म्रुत्यु.शाळा प्रशासनावर प्रश्नचिन्ह !

रुचा दातारकर या विद्यार्थिनींचा दुर्दैवी म्रुत्यु.शाळा प्रशासनावर प्रश्नचिन्ह !

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा शहरातील आनंदवन द्वारका नगरी बोर्डा येथील वादग्रस्त सेंट्यानिस पब्लिक स्कूलमधे येथे एका अकरा वर्षीय विद्यार्थिनींचा डान्स करतांना दिनांक १२ आक्टोम्बर रोज मंगळवारला दुपारी १२ च्या सुमारास दुर्दैवी म्रुत्यु झाल्याने वरोरा तालुक्यात खळबळ उडाली आहे.अगोदरच शाळा व्यवस्थापन विरूध्द पालक असा वाद कित्तेकदा विकोप्याला गेला असताना आता टेमुर्डा येथील रुचा दातारकर या विद्यार्थिनीचा शाळेला सुट्टी असतांना डान्स क्लास शाळेत सुरू होता त्यावेळी तिचा म्रुत्यु कसा काय झाला ? याबद्दल पालकांमधे तर्कवितर्क लावले जात आहे.कुठलीही शाळा ही विद्यार्थिनींची काळजी घेते मग डान्स स्पर्धेत सहभागी रुचाला व तिच्या पालकांना तिच्या प्रक्रुतीबद्दल अगोदर माहिती का देन्यात आली नाही किंव्हा ज्याअर्थी एखाद्या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी आणि फिजिकल टेस्ट का घेण्यात आली नाही ? आणि जर विद्यार्थिनीला कुठलाही त्रास नव्हता तर अचानक ती खाली पडून बेहोष झाली कशी ? असे अनेक प्रश्न पालकांना पडत आहे आणि शाळा व्यवस्थापनाविरोधात पालकांचा आक्रोश आहे.त्यामुळे या शाळेतील व्यवस्थापन आता पालकांच्या पुन्हा रडारवर असून मेडिकल रिपोर्ट मधे रुचाचा अपघात की नैसर्गिक आणि झटक्याने म्रुत्यु ? याबद्दल माहिती मिळू शकते.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा