You are here
Home > महाराष्ट्र > महाशिवआघाडी आणि भाजपला मनसेचा टोला!

महाशिवआघाडी आणि भाजपला मनसेचा टोला!

मुंबई वार्ता

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सक्षम विरोधी पक्षासाठी लोकांनी मतदान करावं असं आवाहन केलं होतं. मात्र त्यांचा फक्त एक आमदार निवडून आला पण राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा महायुती आणि महाआघाडीत सुरु असताना मनसेकडून आता राजकीय नाट्यावर प्रतिक्रिया आलेली आहे. मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी राज्यात सक्षम विरोधी पक्षाची गरज काय हे राज ठाकरेंनी सांगितलं होतं. आता तर सगळेच पक्ष विरोधी पक्षात बसायला तयार झालेत असा मार्मिक टोला त्यांनी लगावला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सक्षम विरोधी पक्षासाठी लोकांनी मतदान करावं. तुमचा राग व्यक्त करण्यासाठी सभागृहात माणसं हवीत असं सांगत पहिल्यांदाच राजकीय इतिहासात विरोधी पक्षात बसण्यासाठी मत देण्याचं आवाहन केलं होतं. मात्र राज ठाकरेंच्या मनसेचा एकमेव आमदार निवडून दिला. कल्याण ग्रामीण मतदारसंघातून मनसेचे राजू पाटील आमदार झाले. इकडे सत्तास्थापनेसाठी राज्यात महायुतीचं बिनसलं असल्याचं चित्र आहे. आणि सगळेच पक्ष जणू विरोधी पक्षात बसायला तयार आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा