You are here
Home > महाराष्ट्र > भाजपने केला शिवसेनेचा गेम, महाराष्ट्राच्या अस्मितेला कलंक ?

भाजपने केला शिवसेनेचा गेम, महाराष्ट्राच्या अस्मितेला कलंक ?

मुंबई:-

महाराष्ट्रात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू झाल्याच दुर्भाग्य असलं तरी विद्यमान विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदासाठी भाजप सेनेने जी राजकीय अस्थिरता निर्माण केली, ती आता भाजप सेनेच्याच अंगलट येतांना दिसत आहे. विधानसभेला निरोप देतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आपल्या भाषणाच्या शेवटी म्हणाले होते ‘शेवटी मी एव्हढेच सांगेन,मी पुन्हा येईन’ त्या नंतर निवडणुकीत प्रचाराच्या दरम्यान मुख्यमंत्री वारंवार आपल्या भाषणात म्हणाले होते ‘मी पुन्हा येईन,मी पुन्हा येईन’मात्र निवडणुकीचा निकाल घोषित झाल्या नंतर भाजप ला १०५ ठिकाणी विजय मिळाला तर शिवसेनेला ५६ ठिकाणी विजय मिळवता आला.’मी पुन्हा येईन’या देवेंद्र फडवणीस च्या घोषणेला सहज सत्य ठरवता येत असल्याचे चित्र असूनही मित्र पक्ष शिवसेनेने सत्तेचे समसमान वाटप व मुख्यमंत्री पहिल्या अडीच वर्षाचा आमचाच हा अट्टाहास धरून मी पुन्हा येईन या घोषनेला खोडा घातला. कारण आमच्याही मागे १७० चे संख्याबळ आहे असे शिवसेनेकडून खा.संजय राऊत यांनी पहिल्याच दिवशी स्पष्ट केले.त्या दृष्टीने खा.संजय राऊत यांनी राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांच्या भेटी देखील घेतल्या.काँग्रेस शिवाय पुढचे काहीच खरे नाही हे जाणून पवार खुद्द दिल्ली ला खा.सोनिया गांधी यांच्या भेटीला गेले होते.मात्र आम्ही विरोधात बसू हे शरद पवारांनी वारंवार सांगितले आहे. राज्यपालाकडून भाजपला सरकार स्थापण्या बाबत विचारणा करण्यात आली होती.मात्र भाजप च्या कोअर कमेटी ची झालेली बैठक व दिल्ली सोबत झालेली चर्चा यातून भाजप ने राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेला नकार दिला.एकंदर ‘आम्ही पुन्हा येणार नाही’हे भाजप ने सांगून राज्यसमोर,शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस पुढे पेच निर्माण केला होता,  आता  राष्ट्रवादी व काँग्रेसने सुद्धा शिवसेनेचा ऐन वेळेवर गेम केल्याने व अगोदरच  राष्ट्रपती लागू करण्याची रणनिती आखल्या ने महाराष्ट्रात  राष्ट्रपती राजवट लागू करण्यात   आली

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा