You are here
Home > Breaking News > नंदलाल कणोजीया यांच्या मारेकऱ्यांना अटक करा-धोबी समाजाची मागणी,

नंदलाल कणोजीया यांच्या मारेकऱ्यांना अटक करा-धोबी समाजाची मागणी,

पोलिस अधीक्षक मोहेश्वर रेड्डी यांना धोबी समाज संघटनेचे निवेदन

चंद्रपूर प्रतिनिधी:-गोरेगांव मुंबई येथे नंदलाल कनोजीया ह्यांच्या
दुकानासमोर गुंडप्रवृत्तीचे माणसे लघवी करीत असतांना त्यांना विरोध केल्यामुळे त्यांनी
नंदलाल कनोजीया हयांचा निर्घृणपणे खून केला. तसेच त्याचे घरावर हल्ला
करून त्यांच्या पत्नीला सुद्धा जखमी करण्यात आले आहे.त्या इस्पितळात मृत्यूशी झुंज देत आहे. हया अमानूषपणे केलेल्या घटनेचा धोबी समाजातर्फे तिव्र निषेध करण्यात येत आहे.
मारेक-यांना त्वरीत अटक होवून त्यांना योग्य ती शिक्षा व्हावी अशी मागणी धोबी समाज संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यातर्फे महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना निवेदने देन्यात आली व त्या दुर्दैवी घटना बाबत महाराष्ट्र शासनास पाठपुरावा करून मारेकन्यांना
तात्काळ अटक करून त्यांना शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा पोलिस अधीक्षक मोहेश्वर रेड्डी यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी भैय्याजी रोहनकर. रोहित तुरानकर कल्पनाताई क्षिरसागर सुरेश चतुरकर किशोर केळझरकर संदीप चटपकर हरिभाऊ भाजीपाले. अशोक ताजने नामदेवराव लोणारवार प्रमोद केळझरकर हिरालाल चौधरी पुडीलीक क्षिरसागर. इत्यादीची उपस्थिती होती

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा