You are here
Home > वरोरा > वरोरा येथे पहिल्या पाणी एटीएमचे नगराध्यक्ष ऐहतेशाम अली यांच्या हस्ते उद्घाटन.

वरोरा येथे पहिल्या पाणी एटीएमचे नगराध्यक्ष ऐहतेशाम अली यांच्या हस्ते उद्घाटन.

पाणी पुरवठा सभापती छोटूभाई शेख यांचा पुढाकार! 

वरोरा प्रतिनिधी :-
वरोरा नगर परिषद पाणीपुरवठा विभाग. व सेफ वॉटर नेटवर्क इंडिया संस्था दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानाने वरोरा शहरातील गोरगरीब सामान्य नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्याकरिता शहरात अनेक ठिकाणी वाटर एटीएम बसवून ५ रुपयात २० लिटर शुद्ध पाणी नागरिकांना दिल्या जात जाणार आहे, त्याचाच एक भाग म्हणून प्रभाग क्रमांक ४ येथील शहीद विर बापूराव शेडमाके वार्डातील उपजिल्हा रुग्णालयाच्या मांगे वॉटर एटीएम बसविण्यात आले असून त्याचे उद्घाटन नगराध्यक्ष एहतेशाम अली यांच्या हस्ते व पाणी पुरवठा सभापती छोटूभाई शेख यांच्या उपस्थितीत व प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले या कार्यक्रमात नगरसेविका ममता मरस्‍कोले सामाजिक संस्थेचे पदाधिकारी राय साहेब दिल्ली,मलिक सर हैदराबाद आणि चंद्रपूर जिल्ह्याचे फिल्ड एक्सिकेटीव्ह श्री राम ताम्हण यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी शहरात वॉटर एटीएमच्या कामाकरिता सहकार्य केल्याबद्दल सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व नगराध्यक्ष यांचे पाणीपुरवठा सभापती छोटूभाई यांनी आभार व्यक्त केले, यावेळी शहरातील.गोरगरीब नागरिकांना शुद्ध पाणी मिळण्याकरिता वाटर एटीएम उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे पदाधिकारी श्री राय व श्री मलिक यांचे नगराध्यक्ष व पाणीपुरवठा सभापती यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले यावेळी कादरभाई अभियंता गेडाम मकसूद भाई प्रमोद निकाळे परसराम मरस्कोल्हे बाबा खंडाळकर सचिन ढवळे चेतन कोल्हे प्रफुल रामटेके शशी कोल्हे मीना वानखेडे सहित अनेक नागरिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने.उपस्थित होते यावेळी आभार व्यक्त करताना छोटूभाई यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले की शहरात असलेल्या सर्व वाटर एटीएम वरून नागरिकांनी पाणी घेऊन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व वरोरा नगरपरिषदच्या या स्तुत्य उपक्रमाचा लाभ घ्यावा. या        प्रसंगी पाण्याच्या  कैंन  सुद्धा नागरिकांना वाटप         करण्यात   आल्या.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा