You are here
Home > नागपूर > नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात वेगळा विदर्भाचा वादग्रस्त विषय मांडू नये -हेमंत गडकरी

नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात वेगळा विदर्भाचा वादग्रस्त विषय मांडू नये -हेमंत गडकरी

 मनसेचे कुलगुरूंना आवाहन !

राष्ट्रसंत तुकडोजी नागपूर विद्यापीठाने विदर्भवादी नेते ऍड श्रीहरी अणे यांच्या पुस्तकाच्या भागाला विद्यापीठाच्या अभ्यासक्रम मंडळाने मुळीच आपल्या अभ्यासक्रमात समाविष्ट करून नवीन वाद निर्माण करू नये,लेखन व विचार स्वातंत्र्य आम्हालाही मान्य आहे मात्र नागपूर विद्यापीठ हे महाराष्ट्राच्या उपराजधानी मध्ये आहे, व हा विषय वादग्रस्त आहे त्याचा समावेश विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करून नवीन वाद निर्माण करू नये असे मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी मनसेच्या शिष्टमंडळासह विद्यापीठा चे कुलगुरू श्री काणे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून आवाहन केले, विद्यापीठात अनेक विद्यार्थी हिताचे प्रश्न प्रलंबित आहेत त्याकडे विद्यापीठाच्या विविध समित्यांनी लक्ष घालावे , बाहेर ज्या प्रश्नाचे राजकारण सुरू आहे, जो प्रश्न वादग्रस्त झाला आहे तो विद्यापीठाच्या कक्षेत आणून उगीच खाजवून खिपल्या काढू नये,ही वास्तू शिक्षण या विषयाशी संबंधित आहे या परिसरात तमाशे व्हावे असे आम्हाला मुळीच वाटत नाही,मुख्य घटक असलेल्या विद्यार्थी वर्गाचे भले होऊन शैक्षणिक दर्जा वाढून विद्यापीठाचा स्तर वाढावा ह्याच विचारांचे आम्ही आहोत मात्र राजकीय दृष्टीने वादग्रस्त विषय आणून आमच्या संयमाची परीक्षा विद्यापीठाने घेऊ नये असा इशारा विद्यापीठाच्या अभ्यासक्रम मंडळाला दिला , तुमच्या भावनांचा नक्कीच विचार करू असे आश्वासन कुलगुरू श्री काणे यांनी मनसे शिष्टमंडळाला दिले ,मनसेच्या शिष्टमंडळात हेमंत गडकरी यांचेसह मनसेचे शहर अध्यक्ष अजय ढोके व विशाल बडगे,मनविसेचे जिल्हा अध्यक्ष दिनेश इलमे,शहर अध्यक्ष आदित्य दुरुगकर, मनसे शहर संघटक अमजद शेख, जनहीतचे चिटणीस सुश्रुत खेर,मनविसेचे शहर उपाध्यक्ष दत्ता साकुलकर विभाग अध्यक्ष मनोज काहलकर, अक्षय दहिकर, व इतर पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा