You are here
Home > वरोरा > सर्पमित्र सोनू रेड्डी यांचा कोब्रा साप दंशाने दुर्दैवी म्रुत्यु!

सर्पमित्र सोनू रेड्डी यांचा कोब्रा साप दंशाने दुर्दैवी म्रुत्यु!

मागील तीन-चार वर्षांपासून सर्पमित्र म्हणून सामाजिक सेवा अपास एनजीओ मार्फत करत होता.टिळक वार्ड येथे साप निघाल्याची घटना कळताच, तो पकडण्यासाठी सर्पमित्र सोनू रेड्डी हे गेले होते. या कोब्रा जातीच्या सापाला पकडल्यानंतर सोडण्यासाठी जंगलात घेऊन गेले यादरम्यान साप सोडत असताना गवळ्या नाग -कोब्रा सापाने सर्पमित्राच्या हाताला दंश केला.त्यामुळे लगेच सर्पमित्र सोनू रेड्डी यांनी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उपचारासाठी धाव घेतली. उपचारादरम्यान डॉक्टर गेडाम यांनी ऑंटी वेनम देऊन प्रकृती स्थिर करण्याचा प्रयत्न केला. परंतु सगळेच प्रयत्न असफल ठरले त्यामुळे लगेच चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती. आणि सर्पमित्र सोनू यांचा दुर्दैवी मृत्यू उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे झाला.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा