You are here
Home > चंद्रपूर > ताडोबाने गाठला उच्चांक १९ दिवसांत २० हजार पर्यटकांची सफारी!

ताडोबाने गाठला उच्चांक १९ दिवसांत २० हजार पर्यटकांची सफारी!

चंद्रपूर प्रतिनिधी :-महाराष्ट्रात हमखास व्याघ्रदर्शनासाठी प्रसिद्ध असलेला ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात मागील १३ दिवसांत सुमारे २० हजारांवर पर्यटकांनी सफारी केली. त्यामुळे दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये सर्वाधिक पर्यटकांनी भेट दिलेल्या व्याघ्रप्रकल्पांमध्ये ताडोबा अव्वल राहिला आहे. डिसेंबरपासून पुढील दीड महिना प्रकल्प ख्रिसमस आणि नववर्षाच्या निमित्ताने फुलण्याचे संकेत वनविभागाच्या सूत्रांनी दिले आहेत.जैविक विविधता, नैसर्गिक वारसा लाभलेल्या तसेच घनदाट जंगलांनी व्याप्त असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीयस्तरावर महत्त्वाचे स्थान आहे. ताडोब्याचे जंगल ‘रॉयल बेंगॉल टायगर’ या वाघाच्या प्रजातीसाठी सर्वाधिक प्रसिद्ध आहे. राज्यातील सर्वाधिक वाघ या प्रकल्पात आहे. याशिवाय बिबट्या, रानमांजरी, हरणे, बारहसिंगे, चितळ, गवे, रानडुक्कर, नीलगाय, रानकोंबड्या, ठिपकेवाली हरणे असे प्राणी आहेत. तर सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मगरी, सुसरी, अजगर, इंडियन कोब्रा, घोरपड हे प्रामुख्याने आढळतात. हे वैविध्य लक्षात घेऊन पर्यटकांनी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये ताडोबा भेटीचा बेत आखला होता. त्यासाठी आगाऊ ऑनलाइन बुकिंगदेखील करून ठेवले होते. कोअर झोनमधील सर्व सहाही गेट फुल्ल झाले. ही स्थिती आतापर्यंत कायम आहे. बफरमध्येदेखील सफारीची संधी मिळाल्याने वन्यप्रेमींचा हिरमोड झाला नसल्याची माहिती ताडोबाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा