You are here
Home > चंद्रपूर > पिकांचे पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी-मनसे

पिकांचे पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी-मनसे

चंद्रपूर प्रतिनिधी :-अवकाळी पावसामुळे धान, सोयाबीन,तूर, हळद, कापूस पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्यापही झालेले नसून त्वरित पंचनामे करून, तात्काळ मदत मिळावी याबाबत महाराष्ट्र भर तालुक्यात मनसेने आंदोलन छेडले आहे. चंद्रपूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.यंदा नोव्हेंबर पर्यंत लांबलेल्या अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रात ३५८ पैकी ३२५ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शेतकरी राजा पुन्हा हवालदिल झाला आहे.इतक्या वर्ष कोरडा दुष्काळ पडला आणि आता ओला दुष्काळ शेतकर्‍यांनी जगायचे कसे, शेतकर्यांनी 1 वर्ष कशाच्या आधारे जगायचे. शेतकर्‍यांच्या मुलांनी शिक्षण कसे घ्यायचे, असे प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. परतीच्या संततधार पावसामुळे 100 टक्के नुकसान झाले आहे, तात्काळ सरसकट पंचनामे करून शेतकर्‍यांना आर्थिक मदत लवकरात लवकर देण्यात यावी.तात्काळ भरीव स्वरुपात आर्थिक मदत देण्यात यावी.अशी मागणी घेऊन मनसे तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर, महिला जिल्हा अध्यक्ष सुनीता गायकवाड, महिलाजिल्हा सचिव अर्चना आमटे, मनवीसे शहर अध्यक्ष नितीन पेंदाम व असंख्य मनसैनिक तहसील कार्यालयात उपस्थित होते.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा