You are here
Home > कोरपणा > कोरपना सिडीसीसी बँक शाखेत कॅश चा तुटवडा!

कोरपना सिडीसीसी बँक शाखेत कॅश चा तुटवडा!

प्रमोद गिरटकर(प्रतिनिधि,

कोरपना तालुक्यातिल सर्वात मोठी बँक असलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कोरपना शाखेत गेल्या आठ दिवसापासुन कॅशचा मोठा तुटवडा असुन ,शेतकरी व्यापारी व हजारो खातेदार यांच्याकडून संताप व्यक्त    केला जात आहे,सध्या शेतकऱ्यांकड्डन शेतमालांची विक्री केली जात असुन ,व्यापाऱ्यांनी  दिलेले धनादेश कोरपना शाखेतून परत पाठविले जात असल्याने बँकेच्या अधिकाऱ्यावर रोष व्यक्त केला जात आहे ,सिडीसीसी बॅकच्या कोरपना शाखेला तांलुक्यातील अंदाजे 125 गावे जोडली असुन ,हजारो खातेदार या शाखेत आहेत ,या शाखेचे 100 कोर्टीचे वाटप असुन ग्राहकांना रोकड काढणे सुलभ व्हावे यासाठी एटीएम याठिकाणि सुरु  करण्यात  आले आहे ,या शाखेतून रोज 1कोटीच्या जवळपास व्यवहार होत असताना गेल्या 11 नोव्हेबरपासुन केवळ 15 लाखांची कॅश या शाखेत पाठविली जात आहे,कोरपना परिसरात 10 जिनिंग असुन ,या माध्यमातुन रोज अंदाजे 10ते15 क्विटल कापूस खरेदि केला जातो शेतकऱ्याना दलालांच्या माध्यमातुन धनादेश दिल्यानंतर सिडिसीसीच्या शाखेतुन रोकड नसल्याने त्यांना परत पाठविण्याचे प्रकार घडत आहे,  या शाखेचा रोजचा व्यवहार मोठा असल्यामुळे कॅशची मर्यादा दिड कोटीपर्यत वाढविण्यात आली होती ,10 नोव्हेबरपर्यत या शाखेतील व्यवहार सुरळीत सुरू होता ,परंतु 11नोव्हेबरपासुन कॅशचा पुरवठा कमी करण्यात आला असुन आता तो 15 लाखांवर आणण्यात आला आहे ,त्यामुळे एटिएमसुद्धा चार दिवसापासुन बंद अवस्थेत आहे, शासनाकडुन अतिवूष्ठीचे अनुदान बैकेत जमा झाले आहे , ही रक्कम अडीच ते तिन कोटीच्या घरात असुन ,शेतकरी कर्मचारी व्यापारी रोज बँकेत चकरा मारत असुन आवश्यक असलेली रोकड मिळ्त नसल्याने त्याना ना ईलाजाने परत जावे लागत आहे ,कॅशबाबत अनेक खातेदारांनी चंद्रपूच्या मुख्य कार्याल्यात संपर्क केला असता कोणतेही अधिकारी उत्तर देत नसल्याने संताप उफाळून येत आहे ,मुख्य कार्यकारी अधिकारी दुबे हेसुद्धा या विषयावर बोलायला तयार नाई ,त्यामुळे खातेदारांमध्ये बंकेविषयी प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे ,दरम्यान ,बुधवारी खातेदारांनी बॅकेत गर्दी केली असता त्याठिकाणी श्रीधराव गोडे ,विजेयराव बावणे ,उत्तम पेचे ,सुरेश मालेकर ,शाम रणदिवे ,संभाजी कोवे भाउजी चव्हाण दिवाकर बोरडे विनायक मालेकर,कांताबाई भगत ,मनोहर चन्ने सुनील बावणे व इस्माइलि बेग उपस्थित होते यावेळी त्यानी बॅकेची रोकड क्षमता वाढउन न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे,

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा