You are here
Home > चंद्रपूर > कर्नाटक एम्टा खुल्या कोळसा खाणीतीली हजारो टन कोळसा चोरी गेल्याचे प्रकरण गुलदस्त्यातच?

कर्नाटक एम्टा खुल्या कोळसा खाणीतीली हजारो टन कोळसा चोरी गेल्याचे प्रकरण गुलदस्त्यातच?

 

प्रशासन अजूनही कुंभकरणी झोपेतच.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते जिल्हा पोलिस अधिक्षकांना चौकशीचे आदेश.

अतुल कोल्हे भद्रावती :-
तालुक्यातील बरांज मोकासा या भागातील कर्नाटक एम्टा कोळसा खान गेल्या चार वर्षापासून बंद आहे. ही कोळसा खाण सुरू असताना कंपनीने जवळपास दीड लाख टन कोळसा साठउन ठेवलेला होता. मात्र आजपावेतो या खाणीतून हजारो कोटी रुपयांचा कोळसा चोरीला गेला आहे. कोळसा खान वितरित करताना यूपीए सरकारने चुका केल्या असे सरकारच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी देशातील अनेक कोळसाखानी बंद केल्या. त्यात भद्रावती तालुक्यातील बरांज मोकासा येथील कर्नाटक या खुल्या कोळसा खाणीचा सुद्धा समावेश आहे. ही कोळसा खान मार्च २०१५ ला बंद करण्यात आली. खान सुरू असताना काढलेला कोळसा इतर वाहतुकीसाठी साठवून ठेवण्यात आला होता परंतु खान बंदीमुळे तो त्याठिकाणी तसाच राहिला या कोळशासह खाणीतील इतर सामग्री सुद्धा इथेच राहिली आहे. या सगळ्यांची देखभाल करण्याकरिता कर्नाटक एम्टाचे काही अधिकारी तसेच सुरक्षा कर्मच्यारी कर्नाटक एम्टा कंपनीने इथे कार्यरत ठेवलेले आहे. बंदच्या काळात या कर्मचाऱ्यांनी काही कोळसा व्यापाऱ्यांशी साठ – गाठ करून कंपनीने साठउन ठेवलेला दीड लाख टन कोळसा विकण्याचा सौदा केला असल्याचे सांगितले जाते. या कोळश्याची किंमत हजारो कोटींच्या घरात जाते. रात्रोला जेसीबीच्या साह्यान कोळसा ट्रक मधे भरून वणी सोबतच इतर ठिकाणी विकला गेला आहे. हे काम गेल्या दोन वर्षापासून सर्रास सुरू आहे. आज या ठिकाणी केवळ २० ते २५ हजार टन कोळसा शिल्लक राहिला आहे. या सुरक्षा कर्मचाऱ्यांना कंपनीने पगारी नेमणूक करून सुरक्षा करण्याचे काम दिले आहे. मात्र सुरक्षा कर्मचारी सुरक्षा ऐवजी हा संपूर्ण कोळसा चोरीच्या घशात घातल्याचे बोलले जात आहे. सदर प्रकरणात काही पोलिस अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी सुद्धा सहभागी असल्याचे बोलले जात आहे. याच कोळसा खाणीतील कोळसा चोरीची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना काही दिवसांपूर्वी दिले होते. मात्र आत्तापर्यंत कर्नाटक एम्टा खुल्या कोळसा खानीतील कोळसा चोरी प्रकरणातील कुठल्याही प्रकारची कारवाई केली नसल्याचे समजते. कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याने चोराट्याांची अजूनही अधुन मधून रात्रोच्या वेळी कर्नाटक एम्टा कोळसा खानीतुन राहिलेल्या कोळश्याची जेसीबी व ट्रक च्या सह्याने चोरी सुरुच असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा