You are here
Home > चंद्रपूर > बाबूराव हरबडे यांनी चार बहिणीचा हिरवला हक्क, बहिणींची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार !

बाबूराव हरबडे यांनी चार बहिणीचा हिरवला हक्क, बहिणींची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार !

बनावट दस्तावेज बनवून हडपली तब्बल वीस एकर शेतजमीन! 

बहिन्यांनी पत्रकार परिषद घेवून मांडली व्यथा.

चंद्रपूर /कोरपणा :-

कधी असं म्हटल्या जात की “सख्खा भाऊ पक्का वैरी” पण अशा घटना समाजात नेहमीच घडत असतात म्हणूनच ही म्हण प्रचलित झाली आहे. खरं तर भाऊ हा बहिणींचा रक्षणकर्ता असतो आणि म्हणूनच भाऊ बहिणींच्या समंधाला एक विशेष महत्व आहे. पण यामधे संपत्ती आणि पैशाचा व्यवहार आला की भाऊ भाऊ राहत नाही तर तो वारसाहक्काने मिळालेल्या संपत्तीवर आपलाच अधिकार गाजवून स्वतःच्या वहिनींना त्यांच्या हक्क अधिकारापासून वंचित ठेवतो प्रसंगी जीवे मारण्याची धमकी देतो. असाच एक प्रकार कोरपणा या गावात घडला असून बाबूराव मल्ल्या हरबडे असे स्वार्थी भावाचे नाव आहे. यांना बयाबाई पारखी, लहानूबाई चिलमूलवार, राधाबाई तग्रतवार, आणि लीलाबाई मोहूर्ले अशा चार सख्ख्या वयस्क बहिणी आहे. त्यांचे वडील वीस वर्षांपूर्वी मरण पावल्या नंतर तब्बल २० एकर जमिनीचे उत्पन्न स्वतः घेणारा बाबूराव हरबडे यांनी स्वतःच्या बहिणीना त्या उत्पन्नाचा हिस्सा तर दिला नाहीच उलट आईच्या नावे असलेली व वडिलांच्या नावे असलेली शेतजमीन बनावट दस्तऐवज व बहिणींच्या बनावट सह्या व अंगठे घेवून पत्नीच्या व स्वतःच्या नावे करून भाऊ बहीणीच्या समंधाला काळिमा फासला आहे. त्यामुळे आपल्या हक्क अधिकारासाठी सर्वच चार बहीणीनी भावाविरोधात बंड करून जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक , उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली आहे. व कोरपणा येथील सर्व्हे क्रमांक ७१/८ ,७१/८ ७१/६ मधील ऐकून आराजी ७,८२ हे आर म्हणजेच ऐकून २०,१७ एकर जमीन एकट्याने हडपली आहे. चारही बहिणी ह्या ६० वर्षा पेक्षा जास्त वयाच्या पुढे असून त्यांनी जेष्ठ नागरिक सरक्षण अधिनियम अंतर्गत वारसहक्काने मिळणारी जमीन देण्यात यावी अशी मागणी तक्रारीत केली आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा