You are here
Home > कोरपणा > मानीकगड सिमेंट कंपनीची मुजोरी, सार्वजनिक रस्ता बंद करून नागरीकाच्या जिवाशी खेळ,

मानीकगड सिमेंट कंपनीची मुजोरी, सार्वजनिक रस्ता बंद करून नागरीकाच्या जिवाशी खेळ,

महसूल अधिकारी जबाबदार, प्रशासनाची बध्याची भुमीका !

कोरपना / गडचांदूर -प्रमोद गिरडकर :-

मानीकगड सिमेंट कंपनीच्या कुसूंबी माईन्स मधून जाणारा सार्वजनिक रस्ता बेकायदेशीर कब्जा करूण वाटसरूना अडवणूक केल्या जात असल्याच्या अनेक तक्रारी तहसीलदार राजूरा व जिवती यांच्या कार्यालयात धूळखात पडल्या आहे . गत वर्षभरात रस्त्यावरूण वाद निर्माण करूण सतत नागरीकांनी दोनदा हा गेट तोडून रस्ता खुला केला, त्यात तहसीलदार राजुरा व बांधकाम विभागाचे अधीकारी भूमी अभीलेख कर्मचारी यांनी भेट देऊन पाहनी केली व ३ महीण्यात कार्यवाही करूण रस्त्याचा प्रश्न सोडविण्याचे तहसीलदार यांनी सागीतले.मात्र ७ महिने होऊन सुद्या साधे नोटीस देण्याचे कर्तव्य पार पाडले नाही . उलट माणिकगड व्यवस्थापनाने सस्त्यावर स्पीड ब्रेकर व नवीन गेट बसवून येण्या जाण्याऱ्या नगारीकांना अडविल्या जात आहे. माणिकगड कंपनीच्या मुजोरीमुळे या परिसरात सतत आंदोलन व असंतोष खदखदत आहे. अनेकवेळा अडवणूकीच्या तक्रारी पोलीसात दिल्या मात्र कोनतीच कार्यवाही कंपनी विरोधात न करता उलट आदीवासीवर ४ वेळा गून्हे दाखल करूण भिती निर्माण करूण कंपनीच्या मुजोरीला पाठबळ देत असल्याचा आरोप नागरीकांनी केला असून खदानीमधे जहाल स्फोटक वापरून खुले आम स्फोट घडवून वण्य प्राणी व नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण केल्या जात आहे. अनेक तक्रारी प्रशासनाकडे देऊन सुद्दा दखल घेतल्या जात नसल्याचे आदीवासी कुटूंबावर उपासमारी व आत्महत्येची पाळी आली, व बळीराजा संकटात आहे. जमीन हडपणे मान्यतेपेक्षा अधिक जमीनीवर कंपनीचा कब्जा आहे. चूनखडी खदानी राजूरा तालुका क्षेत्रात मंजूर नसतांना चुनखडी उत्खनन सुरू आहे.आणि महसूल बुडबुन उत्खनन रोजरासपणे सुरू आहे.मात्र महसूल व खनीकर्म प्रशासनाची बध्याची भूमीका शेतकऱ्याच्या जिवाशी खेळ ठरला आहे. सार्वजणिक रस्त्यावरूण अधिभार असलेले ट्रक वाहतूक नागरीकांसाठी डोके दूखी ठरली असतांना सार्वजनिक रस्त्यावर कंपनीचा कब्जा कसा ? असा प्रश्न उपस्थीत होत असून प्रदूषन नियंत्रण मंडळाने कंपनीच्या शर्तीभंग केल्यावरुण २५ लाख अनामत रक्कम जप्त केली, मात्र प्रदूषन अधिकारी माईन्स भागातील पर्यावरण प्रदूषन व पंचकोशीतील गावात भीती निर्माण झाली . व नागरीकांचे आरोग्य धोक्यात आणले आहे. शेतीतील उभ्या पिकाची नासाडी होत असतांना प्रशासन मात्र गप्प असल्यामूळे नागरीकांनी शंखा निर्माण केली असून प्रलंबित तक्रारीची चौकशी करा, आदीवासींना न्याय द्या अन्यथा आदीवासी रस्त्यावर उतरूण एल्गार करतील असा इशारा ठाणेदार यांना दिलेल्या निवेदनातून जनसत्याग्रह संघटना आदीवासी आघाडीचे अरूण उदे , मारोती येडमे , उत्तम पवार , येंकटी राठोड , भाऊराव कन्नाके यांनी दिले.जनसत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष अबीद अली यांनी राज्यपाल प्रंतप्रधान यांना पाठविलेल्या निवेदनातून कुसूंबीचे ड्रोन सव्हेक्षण व एसआयटी भूमापन उत्खनन सव्हेची मागणी करूण करोडो रुपयाचा महसूल बुडविलेल्या कंपनीवर कार्यवाहीची मागणी केली आहे . उपरोक्त आदीवासीचा प्रश्न खासदार बाळू धानोरकर लोकसभेत गाजणार असल्याचे नागरीकाचे लक्ष लागले आहे

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा