You are here
Home > चंद्रपूर > सुधीर मुनगंटीवार यांच्या शिष्टाईने अखेर भाजपच्या राखी कन्चर्लावार महापौर !

सुधीर मुनगंटीवार यांच्या शिष्टाईने अखेर भाजपच्या राखी कन्चर्लावार महापौर !

चंद्रपूर,प्रतिनिधी :-

महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक चंद्रपूर जिल्ह्याचे राजकारण बदलवुन टाकेल का ? याबद्दल शहरात उलटसुलट चर्चा होती. कारण भाजपचा एक गट हा भाजपच्या राखी कन्चर्लावार यांच्या महापौर बनण्यात अडसर ठरत होता आणि त्यांचा गट हा काँग्रेसला समर्थन करून नवे राजकीय समीकरण तयार करण्याच्या मानसिकतेत होता मात्र सुधीर मुनगंटीवार यांची यशस्वी शिष्टाई आणि त्यांनी दिलेली असंतुष्ट नगरसेवकांना तंबी यामुळे काल शुक्रवारी प्रतिष्ठेची महापौर पदाची निवडणूक भाजप उमेदवार राखी कन्चार्लावार यांनी जिंकली. काँग्रेसनेही या निवडणुकीत रणशिंग फुंकल्याने या निवडणुकीची चुरस मागील काही दिवसांपासून वाढली होती. मात्र भाजप सदस्य अखेरपर्यंत एकत्र राहिल्याने भाजपच्या राखी कंचर्लावार यांचा दणदणीत विजय झाला. राखी कंचर्लावार यांना ४२ मते तर काँग्रेसच्या कल्पना लहामगे यांना २२ मते पडली.  दोन नगरसेवक गैरहजर राहिले. तर काँग्रेसच्या सुनिता लोढिया यांनी आपले नामांकन परत घेतले.यासोबत उप महापौर पदासाठी भाजपचे राहुल पावडे आणि काँग्रेसचे अशोक नागापुरे रिंगणात होते. यात भाजपचे राहुल पावडे यांचा २० मतांनी विजय झाला. त्यांना ४२ मते पडली तर काँग्रेसचे नागापुरे यांनाही २२ मतांवर समाधान मानावे लागले. उर्वरित बसपा आघाडीचे अनिल रामटेके, शहर विकास आघाडीचे दीपक जयस्वाल, काँग्रेसचे प्रशांत दानव आणि मनसेचे सचिन भोयर यांनी आपले नामांकन शुक्रवारी निवडणुकीपूर्वी परत घेतले.चंद्रपूर महानगरपालिकेचे महापौर पद यावेळी महिलेसाठी (खुला प्रवर्ग) राखीव होते. महापौर पदाच्या खूर्चीवर विराजमान होण्यासाठी इच्छुक नगरसेविकांनी आपली धडपड वाढविली होती.  ६६ सदस्यांच्या चंद्रपूर महापालिकेत भाजपकडे स्पष्ट बहुमत म्हणजे ३७ नगरसेवक आहेत. त्यापाठोपाठ कॉंग्रेसकडे १३, बसपा – ६, राष्टÑवादी -२, शिवसेना – २,  मनसे – २, तर चार नगरसेवक अपक्ष आहेत. विद्यमान महापौर अंजली घोटेकर यांचा कार्यकाळ ३० आॅक्टोबरला संपला. मात्र विधानसभा निवडणुकीमुळे त्यांना २१ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली होती. चंद्रपूर महापालिका २०१२ ला अस्तित्वात आल्यापासून तीन महापौर बसले. हे तीनही महापौर महिलाच होत्या आणि आता चवथ्यांदाही महिलाच महापौर राहणार हे निश्चित होते. मागील काही दिवसांपासून मनपा वर्तुळातील राजकीय हालचालींना वेग आला होता.दरम्यान, महापौर पदासाठी भाजपकडून राखी कंचर्लावार तर काँग्रेसकडून सुनिता लोढिया व कल्पना लहामगे यांनी नामांकन दाखल केले होते. उपमहापौर पदासाठी एकूण सहा जणांनी नामांकन दाखल केले.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा