You are here
Home > महत्वाची बातमी > महाराष्ट्रच्या राजकारणात शरद पवारांची पुन्हा दगाबाजी,

महाराष्ट्रच्या राजकारणात शरद पवारांची पुन्हा दगाबाजी,

 शिवसेनेला पाच वर्ष आम्हचाच मुख्यमंत्री हा हट्टहास भोवला! 

महाराष्ट्रनामा :-

महाराष्ट्रच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या मुख्यमंत्र्यांनी सकाळी आठ वाजता मुख्यमन्त्री पदाची शपथ घेतली असावी आणि ती सुद्धा अशा परिस्थितीत की जिथे शिवसेनेच्या नेत्रुत्वात पहिल्यांदाच काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाचे महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात येणार होते. मात्र शरद पवारांची आजपर्यंत राजकारणात असलेली वादग्रस्त खेळी आणि कधी कोणता निर्णय ते घेतील याची शाश्वती नसल्यामुळे अखेर काही लोक झोपेतच असतांना भाजप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एखादं संकट आल्यागत रात्र जागून सत्तेची खिचडी पकवली व महाराष्ट्रात सत्ता बसवली.
शरद पवार हे राजकारणातील बिनभरोशाच व्यक्तिमत्व म्हणून पुन्हा एकदा शीद्ध झालंय.त्यांच्या खऱ्या राजकारणाला सुरुवात झाली ती वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री असताना. कारण त्यावेळी काँग्रेस पक्षाचे 12 आमदार फोडून पवारांनी विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी केली आणि वसंतदादांचे सरकार पाडले. त्यानंतर ‘पवारांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला’ अशी जळजळीत प्रतिक्रिया वसंतरावांनी दिली होती आता तीच परिस्थिती शिवसेनेची झाली आहे. शिवसेना खासदार ज्या पद्धतीने प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत होते आणि सांगत होते की राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत आम्ही सत्तेत बसू पण त्यांनी पाच वर्ष आम्हचाच मुख्यमंत्री राहील ही जी अट शरद पवार आणि काँग्रेसकडे घातली होती त्यामुळे शरद पवार यांनी शिवसेनेचा अर्थात संजय राऊत आणि उद्धव ठाकरे  गेम केला  आणि  पोपट बनविला.

या सर्व घडामोडी मोठ्या गुप्त मार्गाने होतं होत्या आणि महाराष्ट्रातील जनता शिवसेना सरकार येईल या स्वप्नात असतांना शरद पवार यांनी डाव साधला

महाराष्ट्रच्या राजकारणात पुरोगामी विचारसरणीच्या नेत्यांची भरती ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणांत आहे त्या नेत्यांची आता भाजप सोबत सरकार आल्याने गोची होईल. कारण निवडणुकामधे ज्या पद्धतीने राष्ट्रवादीच्या पुरोगामी नेते मंडळींनी भाजप विरोधात रनशिंग फुंकले होते तेच जर जातीयवादी शक्ती सोबत असेल तर त्यांच्यावर जनतेने विश्वास ठेवायचा कसा ? हाही प्रश्न खऱ्या अर्थाने महत्वपूर्ण आहे.पण या शरद पवारांच्या राजकीय खेळीमुळे महाराष्ट्रातील जनतेचा भाजप.राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस या पक्षातील नेत्यावरचा विश्वास उडाला आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा