You are here
Home > मुंबई > लपून मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे फडणवीस थोड्या दिवसाचे पाहुणे ?

लपून मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे फडणवीस थोड्या दिवसाचे पाहुणे ?

लक्षवेधी :-

खरं तर महाराष्ट्रच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी युती आघाडी करून व रात्रीला राजकीय खिचडी पकवून सकाळी सकाळी आठ वाजता मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा आयोजित केला असेल.पण राजकारणात काहीही घडू शकत कारण सत्तेसाठी वाट्टेल त्याला समर्थन करण्याचं तंत्र हे भाजपच जणू शक्तीस्थळ बनलं आहे.काश्मीर मधे मेहबुबा मुक्ती मोहम्मद यांच्या पक्षा सोबत युती करून मूळ भाजपच्या सिद्धांताला यांनी मूठमाती दिली. आणि आता ज्या देवेंद्र फडणवीस यांनी मी आयुष्यात कधीही राष्ट्रवादी सोबत युती करणार नाही अशी भीष्म घोषणा केली होती ती सुद्धा एबीपी माझाच्या सेटवर आणि आता त्याचं राष्ट्रवादी सोबत आघाडी केली म्हणजे भाजपचे सर्वच सिद्धांत नेत्यांनी गुंडाळले का ? आणि आता कट्टर हिंदुत्व किवा स्वाभिमान थोडा तरी शिल्लक राहिलाय का ? असे प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेले आहे . महत्वाची बाब म्हणजे रात्रीच्या अंधारात लफडच होतं, प्रेम होतं नाही त्यामुळे जरी देवेंद्र फडणवीस आता राष्ट्रवादीच्या अजित पवारासोबत राजकीय लफड करून मुख्यमंत्री झाले असले तरी त्यांच मुख्यमंत्री पद हे जास्त काळ टिकणार नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून थोड्याच दिवसाचे पाहुणे आहे आणि थोड्याच दिवसात यांचा राजकीय पाहुणचार संपला की हे माघारी फिरेल अशीच ऐकून महाराष्ट्रातील राजकीय स्थिती आहे.

मुख्यमंत्र्याची शपथविधी असंवैधानिक !

राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी आणि नवीन सरकार स्थापन करण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात त्यामधील एक गोष्ट सुद्धा भाजपच्या नेत्यांनी केली नसल्याने मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा आता असंवैधानिक कक्षेत मोडत आहे.कारण राज्यपालांनी केंद्र सरकारकडे राष्ट्रपती राजवट हटवण्याची शिफारस किती वाजता केली? केंद्र सरकारने राष्ट्रपतींना राष्ट्रपती राजवट हटवण्याची शिफारस कधी केली? राष्ट्रपतींनी केंद्राची शिफारस कधी स्वीकारली?
राज्यपालांनी कोणत्या पत्राद्वारे फडणवीस आणि अजित पवारांना शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात आलं? शपथविधी किती वाजता झाली? माध्यमांना का बोलवण्यात आलं नाही? या प्रश्नांची उत्तरे भाजप कडे नाही. फक्त आपलाच राष्ट्रपती आणि आपलाच राज्यपाल या अर्थाने त्यांनी मध्य रात्री जो काही राजकीय खटाटोप करून सकाळी ८ वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जी बेकायदेशीर आणि लोकशाहीची हत्त्या करणारी घटना आहे.

शरद पवार काय म्हणाले ?

भाजपाला बहुमत स्पष्ट करता येणार नाही, त्यानंतर आम्ही तीन पक्ष मिळून बहुमत सिद्ध करु, शिवसेनेच्या नेतृत्वात राज्यात सरकार स्थापन होईल, आम्ही सगळे एकत्र आहोत, एकत्र राहणार, कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. आणि त्यांनी पक्षाच्या काळ घेतलेल्या बैठकीत विधिमंडळ गटनेते पद अजित पवार कडून काढून जयंत पाटील यांना बहाल केलं, आणि आता भाजपचा गेम केला जाईल असा संकेत दिला

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा