You are here
Home > चंद्रपूर > चंद्रपूर वाहतूक नियंत्रण शाखेतील मोहरर सुखदेव सोनुने यांचा घातपात ?

चंद्रपूर वाहतूक नियंत्रण शाखेतील मोहरर सुखदेव सोनुने यांचा घातपात ?

 पोलिस डायरी 

चंद्रपूर प्रतिनिधी :-

शहरातील पोलिस वाहतूक नियंत्रण शाखेत गेल्या अनेक वर्षांपासून मौहरर या पदावर कार्यरत सुखदेव सोनुने यांचा अचानक कुठलाही आजार नसताना संशयास्पदरित्या झालेला म्रुतु घातपाताने आहे की ह्रुदयविकाराने याबाबत तर्क वितर्क लावल्या जात आहे, या घटनेबाबत आता स्वता पोलिस विभागातील कर्मचारी चर्चा करीत आहे की सुखदेव सोनुने यांच्या घरचे वातावरण ठीक नव्हते.मुलगा आणि पत्नी यांच्यासोबत कोणत्या तरी कारणाने म्रूतकासोबत वाद सुरू होते व त्यांनी याबाबत त्यांच्या काही मित्राकडे ही बाब सांगितली सुद्धा होती एवढच नव्हे तर त्यांच्या डोक्याला असलेली जखम आणि त्यांच्या घराचा समोरचा दरवाजा आतून लावल्या नंतर मागचा दरवाजा खुला होता त्यामुळे त्यांचा घातपात झाला असावा यासाठी मोठी पुष्टी मिळते.
चालान विभागातील कर्मचारी ए.एस.आय.सुखदेव सोनुने हे अतिशय नम्र आणि सर्वांसोबत त्यांचे मधुर समंध असल्यामुळे त्यांच्या संशयास्पद मृत्यूने पोलिस कर्मचारी हळहळ व्यक्त करीत आहे, सुखदेव सोनुने हे नेहमी प्रमाणे ड्युटी करून आपल्या पोलीस क्वार्टरमध्ये गेले असता त्यांचा आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी मृतदेह संशयास्पद रित्या आढळून आला, मात्र यावेळेस त्यांच्या घरचे कुणीही सदस्य उपस्थित नव्हते. त्यामुळे हा घातपात असावा का ? की त्यांचा ह्रुदयविकाराच्या झटक्याणे म्रुत्यु झाला याची चोकशी रामनगर पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा