You are here
Home > चंद्रपूर > सुधीर मुनगंटीवार यांना बहुमत मिळविण्याचा एवढा आत्मविश्वास कशामुळे ?

सुधीर मुनगंटीवार यांना बहुमत मिळविण्याचा एवढा आत्मविश्वास कशामुळे ?

लक्षवेधी

नुकत्याच भाजप आणि अजित पवार व त्यांच्या काही समर्थक आमदाराच्या पाठिंब्यावर भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीच्या एका गटाचे अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देतांना हे सरकार पाच वर्ष चालेल आणि अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते असल्याने त्यांच्या पाठीमागे संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहे असे म्हटले होते, मात्र अगदी त्याचं दिवशी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत म्हटले की अजित पवारांनी भाजपला जे समर्थन दिले ते त्यांचे व्यक्तिगत आहे, त्याचा पक्षाशी काहीएक समंध नाही आणि त्यांनी विधिमंडळ गटनेते पद हे अजित पवार यांचेकडून काढून ते जयंत पाटील यांना दिले आहे.अर्थात आता हे स्पष्ट होतं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भाजपला पाठिंबा नाही आणि सत्तेत सुद्धा भागीदारी नाही त्यामुळे अजित पवार यांचेकडे केवळ सहा ते सात आमदार आहे ते सुद्धा शेवटच्या क्षणी राहील की नाही याची सुद्धा शाश्वती नाही, त्यामुळे फडणवीस सरकारला जे ३० नोव्हेंबरपर्यंत बहुमत शीद्ध करायचं आहे तो १४५ चा आकडा भाजप जुळवणार कुठून ? हा प्रश्न गंभीर आहे.
राजकारणातील सर्वात जास्त पक्ष बदलविणारे आणि स्वतःचा स्वाभिमान भाजपमधे विलीन करणारे नारायण राणे सुद्धा सुधीर मुनगंटीवार सारखे देवेंद्र फडणवीस सरकार आपले बहुमत शीद्ध करेल असे म्हणत आहे, पण एकीकडे फडणवीस म्हणत होते की आम्ही आमदार फोडाफोडीचे राजकारण करीत नाही आणि आज घडीला त्यांच्याकडे १२८ ते १२९ पर्यंतच आमदारांचा आकडा जातो तर बाकी १६ ते १७ आमदार भाजप आणणार कुठून ? हाही एक झोलच आहे, मात्र प्रसारमाध्यमांकडे सुधीर मुनगंटीवार यांच्या अतिआत्मविश्वासाने ज्या मजबूत सरकार बनण्यासाठीच्या प्रतिक्रिया आहे त्या सत्यात उतरणार की भाजप सरकार कोसळनार ? याबद्दल जनतेत संभ्रम असला तरी सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या प्रतिक्रिया म्हणजे भाजप कुठल्याही मार्गाने सरकार बणवेल अशी चिन्ह दिसत आहे.
उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया, देतांना अजित पवार म्हणाले होते की “निकालापासून ते आजच्या तारखेपर्यंत कोणत्याही पक्षाला राज्यामध्ये सत्तास्थापनेचा दावा करता आला नाही. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार येत असेल तर रस्ता काढण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आणि आम्ही सरकार स्थापन केलं,” असं अजित पवार यांनी एनएनआयशी बोलताना सांगितलं आहे. तसेच राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांच्या सत्तास्थापनेबद्दल बोलताना पवार यांनी हे सरकार स्थापन होणं कठीण वाटत होतं अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पण ज्याअर्थी स्वता शरद पवार हे पुढाकार घेवून ‘ comman minimum program’ च्या सहाय्याने मजबूत सरकार तयार करण्याचा प्रयत्न करीत असतांना काकाच्या भरोशावर अजित पवार  यांनी आतापर्यंत जी पदे भोगली ते सुद्धा अजित पवार विसरलेले आहे त्यामुळे शेवटी शरद पवार यांनी सर्वच सूत्र हाती घेवून त्यांनी अजित पवारांकडून विधिमंडळ गटनेते पदही काढले. अर्थात राजकीय घोडेबाजाराला उधाण आले असले तरी भाजपला बहुमताचा आकडा पार करणे कठिनच नाही तर असंभव आहे पण तरीही भाजप कुठल्या राजकीय समीकरणात आपली सत्ता टिकेल हा अंदाज लावताय हे येणारा काळच ठरवेल , , , , , ,

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा