You are here
Home > Breaking News > शिवसेनेच्या मुखपत्र सामना मधून भाजपवर आगपाखड !

शिवसेनेच्या मुखपत्र सामना मधून भाजपवर आगपाखड !

राजकीय कट्टा 

महाराष्ट्रातील संपूर्ण राजकीय सत्तापेचात शिवसेनेची परखड भूमिका बजावणारे शिवसेना नेते संजय राऊत राज्यात फडणवीस आणि अजित पवार यांनी सरकार स्थापन करून जो भूकंप केला त्यावर ‘सामना’मध्ये काय लिहितात याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. संजय राऊत यांनी त्या झालेल्या राजकीय नाट्यावर भाजपचा जोरदार समाचार घेतला आणि मोठी आगपाखड केली होती आणि त्यामधे तो दिवस महाराष्ट्रातील राजकारणातला काळा दिवस असल्याचं म्हटलं आहे.
पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणात शनिवार 23 नोव्हेंबर 2019 हा दिवस ‘काळा दिवस’च म्हणून नोंदवला जाईल. भाजपने 22 तारखेला रात्रीच्या अंधारात गुपचूप हालचाली करून पहाटे मुख्यमंत्र्यांचा शपथविधी उरकला, अशा शब्दात संजय राऊत यांनी अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपवर टीकेचा बाण सोडला आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा असा विश्वासघात केलेला असतानाच राज्यभरात संतापाची लाट उसळली. अजितदादांसोबत गेलेले अनेक आमदारही सायंकाळपर्यंत स्वगृही परतले आणि अवघ्या 12 तासांतच अजितदादांच्या बंडाचे पुरते 12 वाजले, असं सामनामध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर शिवसेनेनं भाजपवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरूवात केली आहे. आता तर  सुप्रीम कोर्टात  भाजप राष्ट्रवादीच्या तथाकथित सरकार संदर्भातील निर्णय उद्या सकाळी येणार आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या मुखपत्रात नेमकं काय येणार याबद्दल वाचकांना ऊस्तुकता आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा