You are here
Home > Breaking News > भाजपचे लोकशाहीला घातक असे ऑपरेशन लोटस पुन्हा सुरू ?

भाजपचे लोकशाहीला घातक असे ऑपरेशन लोटस पुन्हा सुरू ?

लक्षवेधी :-

सत्तेसाठी कुटील डाव आखणारे भाजप तंत्र !

कुठल्याही स्थितीत महाराष्ट्रात आपली सत्ता आणायची या इर्शेने पेटून उठणारी भाजप मंडळी आता येणाऱ्या ३० नोव्हेंबरला बहुमत शीद्ध करण्यासाठी ऑपरेशन लोटस या जुन्या तंत्राचा वापर करतांना दिसत आहे.भाजपने लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसचा विरोधी पक्षनेताच पळवला तर आता विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा विधिमंडळ गटनेताच पळवला, आणि आता तरीही चोरून सत्ता स्थापन केल्यानंतर येणाऱ्या ३० नोव्हेंबरला बहुमत शीद्ध होणार कसे ? या विवंचनेत भाजपकडून जुन्या काँग्रेस नेत्यांकडून ऑपरेशन लोटस यशस्वी करण्याचा डाव खेळल्या जाणार आहे.

काय असेल ऑपरेशन लोटस ? 

भाजपने पहिल्यांदा ऑपरेशन लोटसचा प्रयोग कर्नाटक मधे केला तो सन २००८ मधे.जेंव्हा कर्नाटक विधानसभा निवडणुकीत २२४ आमदारांपैकी भाजपचे ११० आमदार निवडून आले होते आणि त्यांना पुन्हा पाच आमदारांची सत्ता स्थापनेसाठी आवश्यकता होती. त्यामुळे भाजपने ऑपरेशन लोटस च्या कुटनीतीने काँग्रेस आणि जेडीएस च्या आमदारांना राजीनामे द्यायला लावले आणि मग त्या सर्वच आमदारांना भाजपच्या उमेदवारी देवून त्यांना निवडणूक लढवायला लावल्या त्यात त्यांचे पाच आमदार निवडून आले आणि भाजपने तिथे सत्ता टिकवली होती. त्यानंतर पुन्हा तीनवेळा हा प्रयोग करण्यात आला पण दुसऱ्या प्रयोगात भाजपला यश मिळाले नव्हते.
आता महाराष्ट्रात भाजपने चोरी छुपे सरकार तर बनवले पण त्यासाठी बहुमत त्यांच्याकडे नाही त्यामुळे ते राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि इतर पक्ष व अपक्षाना घेवून अथवा त्यांना गैरहजर दाखवून सत्ता आपल्याकडे कशी ठेवता येईल यासाठी ऑपरेशन लोटस चा प्रयोग सुरू केला आहे.या ऑपरेशनची जबाबदारी नारायण राणे, विखे पाटील.बबन पाचपुते व इतरांना देवून सत्ता अबाधित राखण्याचे प्रयत्न चालविलेले आहे.
आता या ऑपरेशन लोटसला यश मिळते की ऑपरेशन लोटस दोन प्रमाने ते टाय टाय फुस्स होते ते येणाऱ्या ३० नोव्हेंबरलाच कळणार आहे.पण भाजप नेत्यांची नीतिमत्ता आणि त्यांचा सत्ता स्थापनेचा स्वार्थ देशाच्या लोकशाहीला घातक आहे हे मात्र तेवढेच सत्य आहे.

आता शिवसेनेचे पण “ऑपरेशन धनुष्य”

भाजपच्या ऑपरेशन लोटस नंतर आता शिवसेनेने सुद्धा ऑपरेशन धनुष्य हे सुरू केले आहे.शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेमधे आपला आकडा भाजपपेक्षा मोठा दिसावा म्हणून व  सत्ता टिकवण्यासाठी भाजपच्या धर्तीवर मनसेचे नगरसेवक चोरून ऑपरेशन धनुष्य चा पहिला प्रयोग यशस्वी केला होता. आता ऑपरेशन धनुष्य यशस्वी करण्यासाठी भाजप मधील असंतुष्ट नेत्यांना आपल्या गळाला लावून आमदार आपल्या बाजूने आणण्याचा प्रयत्न शिवसेना नेत्यांनी चालविलेला आहे.यामधे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या माध्यमांतून काही आमदार शिवसेनेकडे वळविण्याचा प्रयत्न होतं असल्याचे बोलल्या जात आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा