You are here
Home > कोरपणा > मानिकगड माईन्स प्रशासनाचाचा प्रताप.पाणीचोरी मुळे शेती सिचंनावर परिणाम!

मानिकगड माईन्स प्रशासनाचाचा प्रताप.पाणीचोरी मुळे शेती सिचंनावर परिणाम!

प्रमोद गिरडकर :-

कोरपना तालुक्यातील डोंगर पायथ्यालगत मानोली शिवारात हरीतक्रांती निर्माण होऊन सिंचनातुन समुद्धी व शेतकऱ्याचे उत्पादन वाढ व्हावी म्हणून गडचांदर पंचकौशीतील २२ गावाच्या शेती सिचंनासाठी लघु कालवे व पाटबंधारे टाकण्यात आले.मात्र उपरोक्त अमलनाला प्रकल्पातील सिमेंट उघौगाला प्राधान्याने पाणी दिल्या मुळे १५०० हेक्टर सिंचन क्षेत्राला फटका बसल्याने पाटबधारें विभागाने कालव्याची उंची वाढवुन ११०० हेक्टर सिचंनवाढ होण्याचे अपेक्षित होते मात्र यामुळे सिचंन वाढ झालेच नाही उलट लखमापुर पिपळगाव बिबि हरदोना गोपालपुर थुट्रा या गावाच्या कालव्यात पाटचारीला पाणी येत नसल्याने शेतकऱ्याच्या बांधावर पाणी पोहचले नसल्याचे विदारक चित्र येथे दिसुन येते.मात्र मानीकगड सिमेंट कंपनीच्या व्यवस्थापनाने कायदेशीर पाण्याऐवजी कुसुंबी कडून येणारा अमलनाल्याचा पाणीस्रोतच नष्ट करूण २०१० पर्यंत १२ माही वाहणारा अमर नाला गत ८ ते १० वर्षापासून फक्त पावसाळी वाहते मात्र कंपनीने नाल्यालगत चुनखड्डी दगड उत्खनन करीता ७ खदानी खोदून ५० ते ७० मिटर खोल खदानी मध्ये जल साठे हजारो टि सी एम गोळा करुण सुद्धा पाटबधारें अधिकारी अनभिज्ञ आहे. पाणी कराची चोरी शासनाच्या महसुलावर गद्दा आणून नियमानुसार पाणी साठविने अपेक्षित असतांना मान्यते पेक्षा अधिक पाण्याचा उपसा करुण वाणिज्य वापर होत असताना पाटबंधारे अधिकारी यांचे दुर्लक्ष का ? यामुळे शासनाच्या महसुलासह शेतकऱ्याच्या शेती सिचंना वर परिणाम होत असल्याने कुसूबीं माईन्स जलसाठे व कंपनी च्या मनमानी अवैध पाणीवापराची चौकशी करुण कायदेशीर कार्यवाही करणार का? असा सवाल शेतकऱ्यानी उपस्थीत केला असुन संबधित अधिकाऱ्यानी याची गंभीर दखल घ्यावी अशोक मागणी केली आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा