You are here
Home > महाराष्ट्र > अजित पवार राजकीय गमिनी काव्यातून ठरले महाराष्ट्रातील महानाट्टय़ाचे हिरो.

अजित पवार राजकीय गमिनी काव्यातून ठरले महाराष्ट्रातील महानाट्टय़ाचे हिरो.

भाजपचा राजकीय गेम त्यांच्यावरच उलटला.

राजकीय कट्टा :-

महाराष्ट्रात आता शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे संयुक्त सरकार येत असले तरी गेल्या २२ तारखेपासून जे महाराष्ट्रात राजकीय नाट्य सुरू होतं त्या नाट्यात खरे हिरो आणि खलनायक अशा दोन्ही भूमिकेत होते ते अजित पवार. भाजपच्या द्रुष्टीने ते हिरो होते तर शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या द्रुष्टीने ते खलनायक होते पण महाराष्ट्रच्या राजकारणात त्यांची पाच दिवसाची राजकीय भूमिका ही राष्ट्रवादीला नवसंजीवनी देणारी ठरली तर भाजपला ती राजकीय पटलावर खलनायक करणारी ठरली आहे. खरं तर अजित पवार यांनी तात्पुरते जे बंड केले ते त्यांच्या राजकीय आयुष्यात मोठे लाभदायक ठरले आहे. कारण ज्या देवेंद्र फडणवीस यांनी  महाराष्ट्रातील ७० हजार करोडच्या सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना गोवले होते त्याचं फडणवीसानी सत्तेसाठी केंद्र शासनाच्या अधिनिस्त असणाऱ्या सीबीआय कडून अजित पवारांना क्लीनचिट मिळवून दिली आणि हे सर्व अजित पवारांच्या गमिनी काव्यातून घडलं आहे.आणि अर्थातच
अजित पवार खरच मोदी, अमित शहा आणि फडणवीस या तिघांचेही बाप निघाले आहे. यामधे
अजित पवारांनी मोठ्या शिताफीने शरद पवारांना न सांगता भाजपला संपविण्याचा डाव एका अर्थाने यशस्वी केला. भाजपाला सत्तेसाठी नक्की कोण मदत करताहेत व त्यातील यंत्रणा, त्यांनी पाहून घेतल्या.
रात्रीच्या अंधारात भाजपचे, संघाचे आणि नोकरशाहीतले, लोकशाही विरोधी लोक त्यांनी जगासमोर आणले.
केवळ आमदारांच्या सह्या असलेलं पत्र समोर ठेवून राज्यपाल कसे घटनेची गळचेपी करतात, ते सामोरं आणलं. भाजपचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न कायम स्वरुपी संपुष्टात आणलं. व देवेंद्र फडणवीस यांना तोंडघशी पाडलं. भाजपा आणि शिवसेनेची कधीच युती होणार नाही. असा उतावीळपणा देवेंद्र फडणवीसांकडून घडवून आणला. सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी भविष्यात कोण गद्दारी करू शकतो, त्यांचे राजकारण आजच संपविलं. भाजपा किती विश्र्वासघातकी आहे, हे शिवसेनेला कृतीतून दाखवून दिलं. त्यांचे दरवाजे बंद केले. एका रात्रीत राष्ट्रपती राजवट हटविण्याचं जागतिक रेकॉर्ड घडवून आणलं.त्यामुळे मुंबई दिल्लीतील गद्दार गारद केले.
देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री होण्याची लालसा कायम स्वरुपी निकालात काढली.
मोदी शहा यांच्या पेक्षा आम्ही किती कुटील राजकारणी आहोत हे दाखवून दिलं. भाजपा रात्रीत काय काय राजकीय उद्योग करतं ते जनतेसमोर आणलं.
भाजपाच्या सर्वनाशाची त्यांच्यावर वेळ आणली.
महाविकास आघाडीचं सरकार बनविण्याचा त्यांनी मार्ग मोकळा करून शरद पवारांना वाढदिवसाची जणू गिफ्ट दिली. राष्ट्रपती राजवट उठविल्यामुळे तीन महिने आधीच सत्तेचा मार्ग मोकळा केला.  राज्यपाल किती बालीश आणि कुचकामी आहे हे जगासमोर आणलं.
त्यांनी स्वत: शिव्या खाल्ल्या, पण शत्रूच्या गोटात घुसून त्यांचा राजकीय कोथळा बाहेर काढला आणि महाराष्ट्रातील जनतेला फडणवीस यांच्यापासून मुक्ती दिली. खरं तर एवढे रेकाॅर्ड आजवर कोणाच्याही नावाने नोंदविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अजित पवारांचे तसे अभिनंदनच करावे लागेल.
त्यांनी तीन दिवस राजकारणावर अभ्यास केला पण त्यांनी त्या दरम्यान राष्ट्रवादी पक्षावर किंव्हा शरद पवार यांच्यावर टीका केली नाही.एवढेच नव्हे तर त्यांनी स्वतःच्या ट्विटर अकाउंट्स वर सर्व राष्ट्रवादी नेत्या आणि कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला देवून आपण राष्ट्रवादीमधेच आहो आणि शरद पवार हेच माझे नेते आहे असे म्हटले होते.
अर्थात महाराष्ट्रातील सर्व राजकीय नाट्ट्यात नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका पार पाडणारे अजित पवार भाजपचा कर्दनकाळ ठरले आणि महाराष्ट्र हा दिल्लीपुढे झुकत नाही तर गमिनी काव्यातून भल्याभल्यांचे कोथळें बाहेर काढतो हे शीद्ध केले.त्यामुळे अजित पवार गद्दार नाही तर तेच खरे  राजकीय महानाट्ट्याचे  हिरो आहेत.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा