You are here
Home > चंद्रपूर > BLA कंपनी समोर मनसेचे ठिय्या आंदोलन !

BLA कंपनी समोर मनसेचे ठिय्या आंदोलन !

राजुरा सास्ती BLA कंपनीने कामावरून काढले २०० कामगार, कंपनी विरोधात मनसेचा एल्गार ! 

राजुरा प्रतिनिधी :-

राजुरा तालुक्यातील सास्ती येथील BLA नावाच्या कंपनीने कुठलेही ठोस कारण न देता तब्बल २००  कामगारांना कामावरून काढल्याने त्यांचेवर उपासमारीची पाळी आली आली,  मनसे तर्फे कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कामगारांना सोबत घेऊन वेळोवेळी कंपनी प्रशासनाला निवेदन देण्यात आले पण प्रत्येकवेळी कंपनीच्या मॅनेजरानी केवळ खोटे आश्वासन देऊन वेळ काढत गेले, व एकही कामगाराला त्यांनी कामावर घेतले नाही, त्यामळे स्थानिक कामगारांच्या हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व कामगारांनी कंपनिसमोर ठिय्या आंदोलन करण्यात केले, तब्बल 6 तास कंपनी चे काम बंद करण्यात आले,त्यानंतर कंपनीच्या मॅनेजरनी मनसे पदाधिकारी

यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.
कंपनीचे मॅनेजर, WCL चे ,W CLचे एरिया मॅनेजर व राजुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार , व मनसे जिल्हाध्यक्ष सौ. सुनीताताई गायकवाड, जिल्हा सचिव किशोरभाऊ मडगूलवार, विधानसभा अध्यक्ष महालिंग जी कंटाळे तालुका अध्यक्ष राजुभाऊ गड्डामवार, महिला तालुका अध्यक्ष कल्पना पोतारलावर,
मनसैनिक कृष्णा गुप्ता,प्रवीण शेवते, मुकेश किरंगे, यांनी सर्वांनी एकत्रीत बसून चर्चा केली, येणाऱ्या 3/ 12/ 2019 ला कंपनी मालक स्वतः उपस्थित राहून स्थानिक लोकांना 50% रोजगार देऊ असे आश्वासन दिले आहे, येणाऱ्या 3 तारखेला कामगारांना कामावर घेतले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना BLA कंपनी पूर्णपणे बंद करणार अशी चेतावणी महिला जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड व जिल्हा सचिव किशोरभाऊ मडगूळवार यांनी दिली, यावेळी असंख्य महिला व पुरुष कामगार उपस्थित होते.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा