You are here
Home > Breaking News > विजय वडेट्टीवार यांच्या रूपाने, ब्रम्हपुरी मतदार संघात पहिल्यांदाच मिळणार मंत्री,

विजय वडेट्टीवार यांच्या रूपाने, ब्रम्हपुरी मतदार संघात पहिल्यांदाच मिळणार मंत्री,

ब्रम्हपुरी मतदार संघातील जनतेला मिळणार पर्वणी ! 

ब्रह्मपुरी प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यात विजय वडेट्टीवार यांनी स्वकर्तुत्वाने चिमूर या क्रांतिकारी विधानसभा क्षेत्रात आपली पकड मजबूत केल्यानंतर काँग्रेस पक्षात चिमूर विधानसभा क्षेत्रात वाजुरकर यांनी दावा केला त्यामुळे त्यांच्यासाठी ही जागा त्यांनी  मोकळी करून दिली आणि स्वतःला ब्रम्हपुरी सारख्या नवख्या विधानसभा मतदार संघात झोकून दिलं,  पण जो शेर आहे तो आपली कुठेही जागा निर्माण करतो अगदी त्याचं प्रमाने विजय वडेट्टीवार यांनी मागील सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ब्रम्हपुरी सारख्या नवख्या क्षेत्रात स्वतःची  प्रचंड परिश्रम करून अगदी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची सभा झाल्या नंतर सुद्धा विजय वडेट्टीवार यांनी विजयश्री खेचून आणली.

नुकत्याच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या . त्यात ब्रम्हपुरी विधानसभेचा अनोखा इतिहास आहे,  कारण राजकीय प्रवाहाच्या विरुद्ध जाणारा हा मतदारसंघ असून आमदार एका पक्षाचा तर सत्ता दुसऱ्याच पक्षाची अशी आजपर्यंतची परंपरा आहे.त्यामुळे या क्षेत्राचा पाहिजे त्या प्रमाणात विकास झाला नाही. तसेच या क्षेत्राला अजून पर्यंत कुठलेही मंत्रीपद मिळालेली नाही.
मात्र एक महिन्याच्या राजकीय प्रवासानंतर शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या युतीतून सरकार स्थापन होत  आहेत व त्यात ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व करणारे आमदार विजय भाऊ वडेट्टीवार यांची महत्वाची भूमिका व पक्षातील स्थान लक्षात घेता त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो, सत्ता स्थापनेसाठी साम-दाम-दंड-भेद याचा वापर करून येणाऱ्या काळातील राजकीय प्रवासाचा व पक्षाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी रणनीती आखली जाते त्याचाच भाग म्हणून की काय कोणत्याही पक्षाला विधानसभेमध्ये स्पष्ट बहुमत न मिळाल्याने व भाजप-शिवसेना यांच्यात फारकत येऊन शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाची अट घातली मात्र केंद्रात भाजपचे सरकार व विधानसभेत शिवसेनेपेक्षा जास्त उमेदवार निवडून आल्याने ही ऑफर भाजपाने नाकारून भाजप शिवसेनेची युतीचे स्वप्न भंगले. याचाच फायदा काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसने पुढील येणाऱ्या निवडणुकीकरिता पक्षाला मजबूत करण्याकरिता सत्तेत राहणेआवश्यक असल्याने  काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपारिक विरोधक असलेल्या शिवसेना सोबत युती करण्याचे संकेत दिले व शिवसेनेचा पाच वर्ष मुख्यमंत्री असल्याचेही स्पष्ट करीत . महाआघाडी केली.तीनही राजकिय पक्षांच्या सहमती नंतर १डिसेंबरला

शिवसेनेचे नेत्रुत्व असणारे सरकार अस्तित्वात येणार आहे आणि ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांचा सत्तास्थापनेसाठी महत्वाची भूमिका बघता त्यांना शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी या युतीचे सरकार प्रस्थापित झाल्यास मंत्री मंडळात स्थान नक्की मिळू शकते. ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे
विजय आमदार विजय वडेट्टीवार यांना मंत्रीपद मिळाल्यास ब्रह्मपुरी विधानसभेचा परिवर्तनाचा नवा इतिहास घडेल व सत्तेत राहिल्याने या भागाच्या विकासात कोणतीही अडचण येणार नाही. असे बोलल्या जात आहे तसेच बऱ्याच वर्षापासून ब्रह्मपुरी जिल्ह्याची मागणी विजय वडेट्टीवार यांच्या नेत्रुत्वात पूर्णत्वास येऊ शकते असा कार्यकर्त्याचा ठाम विश्वास असल्याने येणारा विकासाचा काळ या क्षेत्राला नवा आयाम देईल ही अपेक्षा मतदार ठेवून आहेत.विजय वडेट्टीवार यांना मंत्री पद मिळणार ही बातमी राजकीय वर्तुळात चर्चिला जात असून कार्यकर्त्याच्या स्वप्नाची पूर्तता काही दिवसातच पूर्ण होणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
एकंदरीत विजय वडेट्टीवार यांच्या रूपाने या विधानसभा क्षेत्राला मंत्रीपद मिळणार व अनोखा इतिहास रचल्या जाणार व नवा इतिहास घडवण्याची किमया विजय वडेट्टीवार च्या रूपाने काही दिवसात प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा